New Maruti EVX: इलेक्ट्रिक कार कडे वाढणारा लोकांचा कल बघता बऱ्याच दिग्गज कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात आणल्या आहेत. भारतीय बाजारात ज्या मारुतीचं वर्चस्व आहे त्या मारुती सुझुकीने अद्याप एकही इलेक्ट्रिक कार बाजारात आणलेली नाही. परंतु आता मारुती सुझुकी इलेक्ट्रिक कारच्या बाजारात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे.
Table of Contents
मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही मारुती ईव्हीएक्स (Maruti Suzuki eVX) लवकरच ग्राहकांच्या सेवेत येणार आहे. जपान मध्ये झालेल्या ऑटो शोमध्ये मारुतीने त्यांचे पहिले इलेक्ट्रिक वाहन प्रदर्शित केले आहे.
मारुती सुझुकी ईव्हीएक्स डिझाईन New Maruti EVX Design
ऑटो शोमध्ये दाखवण्यात आलेल्या कारच्या डिझाईनच्या बाबतीत सांगायचे झाले तर मारुती सुझुकी ईव्हीएक्स (New Maruti EVX) फ्युचरिस्टिक असणार आहे. मस्क्यूलर बंपर सोबतच एलईडी डीआरएल हेडलाइट देण्यात आल्या आहेत. साइड प्रोफाइलने बघताना देखील हि मारुती सुझुकी ईव्हीएक्स उत्कृष्ट असणार आहे. मारुती सुझुकी ईव्हीएक्स मागच्या बाजूने बघताना देखील मस्क्यूलर असणार आहे. कनेक्टेड एलईडी टेल लाइट युनिट देण्यात आले आहे. मारुती सुझुकी ईव्हीएक्स एक क्रॉसओवर एसयूव्ही असल्याचा फिल देणार आहे.
बाहेरील डिझाइन प्रमाणेच कारच्या आतील बाजूच्या डिझाइनवर देखील भर देण्यात आला आहे. फ्युचरिस्टिक डिझाइनला प्राधान्य देण्यात आले आहे. डॅशबोर्ड,एसी व्हेंट्स आणि स्टीयरिंग व्हील मारुतीच्या इतर कार पेक्षा वेगळे देण्यात आले आहे. गेअर देखील गोल फिरणारे देण्यात आले आहेत. तसेच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील देण्यात आला आहे. मारुती सुझुकी ईव्हीएक्स मध्ये इलेक्ट्रॉनिक सनरूफ, वायरलेस मोबाइल चार्जिंग आणि ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल्स देखील देण्यात येणार आहेत. या कार मध्ये आधुनिकी कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. मारुती सुझुकी ईव्हीएक्स हि कार बाजारात येण्यापूर्वी या कार मध्ये काही बदल अजून केले जातील असे जाणकारांचे म्हणणे आहे.
मारुती सुझुकी ईव्हीएक्स बॅटरी आणि रेंज – New Maruti EVX Battery and Range
मारुती सुझुकी ईव्हीएक्स भारतीय बाजारात किती मॉडेल मध्ये येणार हे अजून तरी कंपनीकडून सांगण्यात आलेले नाही. ऑटो शोमध्ये सांगितल्याप्रमाणे ६० किलोवॅटची बॅटरी या कार मध्ये असेल जी एका फुल चार्जिंग मध्ये ५५० किलोमीटरचा पल्ला गाठेल. मारुती सुझुकी ईव्हीएक्स मध्ये ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) चा पर्याय देखील ग्राहकांना दिला जाणार आहे.
मारुती सुझुकी ईव्हीएक्सची किंमत? New Maruti EVX Price in India
भारतीय बाजारपेठेमध्ये मोठे लक्ष डोळ्यासमोर ठेवून मारुती सुझुकी या मारुती सुझुकी ईव्हीएक्सची (Maruti Suzuki eVX Price) किंमत इतर इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत कमी ठेवण्याची शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये या कार ची किंमत २५ लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु जाणकारांच्या मते मारुती सुझुकीची हि पहिली इलेक्ट्रिक कार असल्यामुळे याची किंमत इतर कंपन्यांपेक्षा कमी असू शकते. भारतीय बाजारात मारुती सुझुकी ईव्हीएक्स ची थेट स्पर्धा Tata Nexon EV, Mahindra XUV400 EV, MG ZS EV आणि Hyundai Kona EV यांच्या सोबत असणार आहे.
भारतीय बाजारपेठेत कधी येणार? New Maruti EVX Launch Date in India
मारुती सुझुकी ईव्हीएक्स (New Maruti EVX) भारतीय बाजारपेठेत कधी लॉन्च होणार हे अद्याप निश्चित झाले नसले तरी जाणकारांच्या मते २०२५च्या सुरवातीच्या टप्यात मारुती सुझुकी ईव्हीएक्स भारतीय बाजारपेठेत दाखल होईल असे सांगितले जात आहे.
मारुती सुझुकी च्या कार नेहमीच भारतीयांच्या पसंतीच्या राहिल्या आहेत. आता या नवीन इलेक्ट्रिक कारला भारतीय कसा प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल. जर कंपनीला भारतात चांगला व्यवसाय करायचा असेल तर कार च्या किंमतींकडे कंपनीला नीट लक्ष द्यावा लागेल.
FAQ:
मारुती सुझुकी ईव्हीएक्सची किंमत? New Maruti EVX Price in India
भारतीय बाजारपेठेमध्ये मोठे लक्ष डोळ्यासमोर ठेवून मारुती सुझुकी या मारुती सुझुकी ईव्हीएक्सची (Maruti Suzuki eVX Price) किंमत इतर इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत कमी ठेवण्याची शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये या कार ची किंमत २५ लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु जाणकारांच्या मते मारुती सुझुकीची हि पहिली इलेक्ट्रिक कार असल्यामुळे याची किंमत इतर कंपन्यांपेक्षा कमी असू शकते.
मारुती सुझुकी ईव्हीएक्स बॅटरी आणि रेंज – New Maruti EVX Battery and Range
मारुती सुझुकी ईव्हीएक्स भारतीय बाजारात किती मॉडेल मध्ये येणार हे अजून तरी कंपनीकडून सांगण्यात आलेले नाही. ऑटो शोमध्ये सांगितल्याप्रमाणे ६० किलोवॅटची बॅटरी या कार मध्ये असेल जी एका फुल चार्जिंग मध्ये ५५० किलोमीटरचा पल्ला गाठेल.
भारतीय बाजारपेठेत कधी येणार? New Maruti EVX Launch Date in India
मारुती सुझुकी ईव्हीएक्स (New Maruti EVX) भारतीय बाजारपेठेत कधी लॉन्च होणार हे अद्याप निश्चित झाले नसले तरी जाणकारांच्या मते २०२५च्या सुरवातीच्या टप्यात मारुती सुझुकी ईव्हीएक्स भारतीय बाजारपेठेत दाखल होईल असे सांगितले जात आहे.