POCO X6 Pro 5G हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. आधुनिक AI फिचर्स चा वापर या स्मार्टफोन मध्ये करण्यात आला आहे.
Table of Contents
भारतातील मोठया प्रमाणात युवा वर्ग POCO स्मार्टफोन चा वापर करतात. युवा वर्गात नेहमीच POCO च्या मोबाईल ला पसंती दिली जाते. POCO चे मोबाईल लुक ला आणि त्यांच्या स्पीड साठी ओळखले जातात. POCO X6 Pro 5G ची उत्सुकता त्यांच्या ग्राहकांना होती पण आता ग्राहकांना लवकरच हा स्मार्टफोन विकत घेता येणार आहे.
पोको X6 प्रो डिस्प्ले – POCO X6 Pro 5G Display
POCO X6 Pro 5G मध्ये ६.६७ इंचाचा अल्ट्रा-स्लिम बेझल डिस्प्ले देण्यात आला आहे. १२० Hz रिफ्रेश रेट सह AMOLED डिस्प्ले मध्ये १२२० x २७१२ चे रिझोल्यूशन POCO च्या या नवीन स्मार्टफोन मध्ये तुम्हांला मिळणार आहे. पोको X6 प्रो च्या या डिस्प्ले १८०० nits चा ब्राइटनेस मिळणार आहे. विविध प्रकाश परिस्थितींमध्ये तुमच्या डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी या स्मार्टफोनचा डिस्प्ले ब्राइटनेस स्वतःहून कमी जास्त होतो. स्मार्टफोन त्वरित अनलॉक करण्यासाठी डिस्प्लेवर इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
पोको X6 प्रो कॅमेरा – POCO X6 Pro 5G Camera
पोको X6 प्रो चा प्राथमिक कॅमेरा ६४ मेगापिक्सेल चा असून ८ मेगापिक्सेल चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल चा मायक्रो कॅमेरा असा ट्रिपल कॅमेरा सेटअप या स्मार्टफोन मध्ये देण्यात आला आहे. सोबतच १६ मेगापिक्सेल चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोन मध्ये 4K व्हिडिओ OIS & EIS मुळे स्थिर रेकॉर्ड करता येणार आहेत.
पोको X6 प्रो (POCO X6 Pro 5G) मध्ये वापरण्यात आलेल्या AI फिचर्स मुळे तुम्ही काढलेले फोटो उत्तम अनुभव तुम्हांला देणार आहेत. AI फिचर्स मुळे फिरत असलेली लोक किंवा प्राणी हा कॅमेरा स्वतःहून ओळखून तुमचे फोटो किंवा व्हिडिओ हा पोको X6 प्रो स्मार्टफोन कॅप्चर करणार आहे. अल्ट्रा-फास्ट शटर स्पीड मुळे प्रत्येक क्षण तुम्ही चांगल्या पद्धतीने कॅप्चर करू शकाल. या स्मार्टफोन मध्ये नवीन फिल्म फिल्टर आणि फ्रेम्स देण्यात आल्या आहेत ज्यामुळे तुमचे फोटो आणि व्हिडिओ सिनेमातील कलर प्रमाणे दिसतील.
पोको X6 प्रो प्रोसेसर- POCO X6 Pro 5G Processor
POCO X6 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 8300-Ultra फ्लॅगशिप TSMC 4nm प्रोसेसर वापरण्यात आला आहे. पोको X6 प्रो प्रोसेसर हाय-स्पीड कामगिरी करण्यासाठी सक्षम आहे. या स्मार्टफोन चा AnTuTu स्कोअर १,४६४,२२८ आहे. इंटेलिजेंट फ्रेम स्टॅबिलायझेशन तंत्रज्ञान गेमिंग चा उत्तम अनुभव देते. गेमिंग खेळणाऱ्या ग्राहकांना या स्मार्टफोनच्या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे.
पोको X6 प्रो बॅटरी आणि चार्जर – POCO X6 Pro 5G Battery & Charger
POCO X6 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची अल्ट्रा-लार्ज बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हांला संपूर्ण दिवस स्मार्टफोन चार्ज करावा लागणार नाही. व्हिडिओ पाहत असाल तर १९+ तास, नेव्हिगेट करत असताना १५+ तास, म्युजिक ऐकताना ५०+ तास तर कॉलिंग करताना २९+ तास या स्मार्टफोनची बॅटरी चालणार आहे. ६७W टर्बो चार्जर सोबत USB Type-C पोर्ट या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. ६७W टर्बो चार्जरमुळे ० ते १०० टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी ४५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे.
पोको X6 प्रो मध्ये मल्टीफंक्शनल NFC, आयआर ब्लास्टर, Wi-Fi 6, ड्युअल स्पीकर्स आणि डॉल्बी ऍटम सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
पोको X6 प्रो ची भारतात किंमत – POCO X6 Pro 5G Price in India
POCO X6 Pro 5G भारतीय बाजारात आला असून ८GB रॅम + २५६GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत २६,९९९/- तर १२GB रॅम + २५६GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत २८,९९९/- ठेवण्यात आली आहे. POCO च्या अधिकृत वेबसाईट वरून किंवा फ्लिपकार्ट वर जाऊन तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहात. फ्लिपकार्ट वर तुम्हांला नो कोस्ट EMI ने सुद्धा हा स्मार्टफोन विकत घेता येईल.
*कृपया लक्षात ठेवा की किमतींमध्ये कालांतराने चढ-उतार होऊ शकतात.
पोको X6 प्रो 5G भारतात लॉन्च होण्याची तारीख – POCO X6 Pro 5G Launch Date in India
POCO X6 Pro 5G ११ जानेवारी २०२४ ला भारतात लॉन्च करण्यात आला आहे. POCO च्या अधिकृत वेबसाईटवर आणि फ्लिपकार्ट वर हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.
FAQ:
पोको X6 प्रो किंमत? POCO X6 Price?
POCO X6 Pro 5G भारतीय बाजारात आला असून ८GB रॅम + २५६GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत २६,९९९/- तर १२GB रॅम + २५६GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत २८,९९९/- ठेवण्यात आली आहे. POCO च्या अधिकृत वेबसाईट वरून किंवा फ्लिपकार्ट वर जाऊन तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहात. फ्लिपकार्ट वर तुम्हांला नो कोस्ट EMI ने सुद्धा हा स्मार्टफोन विकत घेता येईल.
पोको X6 प्रो antutu स्कोअर? POCO X6 Pro antutu score?
POCO X6 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 8300-Ultra फ्लॅगशिप TSMC 4nm प्रोसेसर वापरण्यात आला आहे. पोको X6 प्रो प्रोसेसर हाय-स्पीड कामगिरी करण्यासाठी सक्षम आहे. या स्मार्टफोन चा AnTuTu स्कोअर १,४६४,२२८ आहे.
पोको X6 प्रो कॅमेरा? POCO X6 Pro 5G Camera?
पोको X6 प्रो चा प्राथमिक कॅमेरा ६४ मेगापिक्सेल चा असून ८ मेगापिक्सेल चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल चा मायक्रो कॅमेरा असा ट्रिपल कॅमेरा सेटअप या स्मार्टफोन मध्ये देण्यात आला आहे. सोबतच १६ मेगापिक्सेल चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोन मध्ये 4K व्हिडिओ OIS & EIS मुळे स्थिर रेकॉर्ड करता येणार आहेत.