फोर्ड इंडियाने त्यांची एसयूवी फोर्ड एंडेवर ला पुन्हा भारतात आणायची तयारी सुरु केली आहे.

अमेरिकन कंपनी फोर्डने २०२१ मध्ये भारतात विक्री बंद केली होती परंतु पुन्हा भारतात कार विक्रीसाठी फोर्डने तयारी सुरु केली आहे.

फोर्ड इंडिया ने पुन्हा भारतीय बाजारात येण्यासाठी नव्याने पेटेंट दाखल केलं आहे असे समजते.

सध्या फोर्ड एंडेवरच सेकंड हॅन्ड मार्केट खूप आहे. फोर्ड एंडेवरची स्पर्धा नेहमीच टोयोटा फॉर्च्यूनर सोबत होताना दिसते.

फोर्ड चेन्नईच्या फैक्ट्रीमध्ये त्यांच्या नवीन फोर्ड एंडेवर चे उत्पादन करणार असे समजते आहे.

परंतु काही सूत्रांकडून असे देखील समजते आहे कि भारतात उत्पादन न करता फोर्ड एंडेवर आयात करून भारतात आणली जाऊ शकते.

जर भारतात उत्पादन न करता फोर्ड एंडेवर आयात करून भारतात आणली तर तिची किंमत फॉर्च्यूनर पेक्षा जास्त जाऊ शकते.

आयात केलेल्या फोर्ड एंडेवरची किंमत भारतीय बाजारात ६० लाखांपासून पुढे जाऊ शकते. सध्या फॉर्च्यूनर ची एक्स शोरूम किंमत ३३ लाखांपासून ते ५२ लाखांपर्यंत आहे.

नवीन फोर्ड एंडेवर मध्ये २.२ लिटर टर्बो डिझेल आणि ३.० लिटर टर्बो डिझेल इंजिन येईल. सोबतच 2WD आणि 4WD चे पर्याय देखील असणार आहेत.

नवीन फोर्ड एंडेवर भारतीय बाजारात २०२५ पर्यंत येईल असे सूत्रांकडून समजते.