नवीन मोबाईल घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता मोबाईल फोन होणार स्वस्त. 

सरकारने मोबाईल पार्ट्सवर लागणारे आयात शुल्क कमी केले आहे.

भारतीय अर्थ मंत्रालयाने मोबाईल पार्ट्सवरील आयात शुल्क कमीकरण्याची घोषणा केली आहे.

मोबाईल पार्ट्सवर सध्या लागणारे १५ टक्के आयात शुल्क कमी करून आता १० टक्क्यांपर्यंत करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे भारतीय बाजारात स्मार्टफोन च्या किंमती ३ ते ५ टक्क्याने कमी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) ने या या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

मोटोरोला, सॅमसंग आणि शाओमी साठी मोबाईल बनवणारी कंपनी डिक्सन टेक्नॉलॉजीजने सुद्धा या निर्णयाचे स्वागत केले आहे.

काही तज्ज्ञांच्या मते या निर्णयाने जास्त फायदा होणार नाही असे बोलले जात आहे.

परंतु काही तज्ज्ञांच्या मते या निर्णयाने भारत जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होईल असे बोलले जात आहे.

Realme 12 Pro+ ची किंमत आणि मॉडेल?