विवो X200 प्रो घेताय तर हे नक्की वाचा

विवो X200 प्रो (VIVO X200 Pro 5G) हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. २०० मेगापिक्सेल चा ZEISS APO टेलीफोटो कॅमेरा आणि आधुनिक AI फिचर्स चा वापर या स्मार्टफोन मध्ये करण्यात आला आहे. 

भारतातील मोठया प्रमाणात युवा वर्ग विवो स्मार्टफोन चा वापर करतात. युवा वर्गात नेहमीच विवो च्या मोबाईल ला पसंती दिली जाते. विवो चे मोबाईल त्यांच्या उत्कृष्ट कॅमेरासाठी ओळखले जातात.  VIVO X200 Pro ची उत्सुकता त्यांच्या ग्राहकांना होती पण आता ग्राहकांना लवकरच हा स्मार्टफोन विकत घेता येणार आहे.

Table of Contents

विवो X200 प्रो डिस्प्ले – VIVO X200 Pro Display

विवो X200 प्रो डिस्प्ले

VIVO X200 Pro मध्ये ६.७८ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. १२० Hz रिफ्रेश रेट सह AMOLED डिस्प्ले मध्ये २८०० x १२६० चे रिझोल्यूशन विवो च्या या नवीन स्मार्टफोन मध्ये तुम्हांला मिळणार आहे. विवो X200 प्रो च्या या डिस्प्ले ४५०० nits चा ब्राइटनेस मिळणार आहे. विविध प्रकाश परिस्थितींमध्ये तुमच्या डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी या स्मार्टफोनचा डिस्प्ले ब्राइटनेस स्वतःहून कमी जास्त होतो. स्मार्टफोन त्वरित अनलॉक करण्यासाठी डिस्प्लेवर 3D अल्ट्रासोनिक सिंगल-पॉइंट फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

विवो X200 प्रो कॅमेरा – VIVO X200 Pro Camera

विवो X200 प्रो चा प्राथमिक कॅमेरा २०० मेगापिक्सेल चा ZEISS APO टेलिफोटो कॅमेरा असून ५० ZEISS ट्रू कलर मेन कॅमेरा आणि ५० मेगापिक्सेल चा अल्ट्रा वाईड कॅमेरा असा ट्रिपल कॅमेरा सेटअप या स्मार्टफोन मध्ये देण्यात आला आहे. सोबतच ३२ मेगापिक्सेल चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोन मध्ये 4K 60FPS HDR डॉल्बी व्हिजन, 4K HDR सिनेमॅटिक पोर्ट्रेट व्हिडिओ, 120FPS स्लो-मोशन रेकॉर्ड करता येणार आहेत. 

विवो X200 प्रो कॅमेरा

विवो X200 प्रो कॅमेरामध्ये स्नॅपशॉट, लँडस्केप, पोर्ट्रेट, फोटो, व्हिडिओ, पोर्ट्रेट व्हिडिओ, उच्च रिझोल्यूशन, पॅनोरामिक, अल्ट्रा एचडी डॉक्युमेंट, स्लो-मोशन, टाइम-लॅप्स आणि इतर पर्याय देण्यात आले आहेत. ज्यामुळे तुमचे फोटो आणि व्हिडिओ सिनेमातील कलर प्रमाणे दिसतील. या स्मार्टफोन मध्ये स्ट्रीट फोटोग्राफी मोड सुद्धा देण्यात आला आहे, स्ट्रीट फोटोग्राफी मोड क्लासिक ब्लॅक-अँड-व्हाइटसह टेक्सचर कलर एकत्र करून, प्रत्येक दृश्यात कला आणतो. विवो X200 प्रो चा स्पोर्ट्स मोड शून्य-शटर-लॅग आणि मोशन ट्रॅकिंगचा वापर करून प्रत्येक जलद-वेगवान क्षण अचूकपणे कॅप्चर करतो.

विवो X200 प्रो प्रोसेसर- VIVO X200 Pro Processor

विवो X200 प्रो प्रोसेसर

VIVO X200 Pro मध्ये 2nd-Gen MediaTek Dimensity 9400 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. विवो X200 प्रो प्रोसेसर हाय-स्पीड कामगिरी करण्यासाठी सक्षम आहे. ओव्हरहाटिंग किंवा बॅटरी ड्रेन न करता सुरळीत काम हा प्रोसेसर करतो. सोबतच विवो X200 प्रो मध्ये V3+ चिप देण्यात आली आहे जी उच्च कार्यक्षमतेसह इमेजिंग वाढवते, फोटोग्राफी आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये अतुलनीय स्पष्टता आणि व्हायब्रन्स प्रदान करते.

विवो X200 प्रो बॅटरी आणि चार्जर – VIVO X200 Pro Battery & Charger

VIVO X200 Pro या स्मार्टफोनमध्ये ६००० mAh ची 3rd-Gen Silicon Anode आणि सेमी-सॉलिड बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे अत्यंत थंडीत -20°C पर्यंत स्थिर कामगिरी सुनिश्चित करते. शिवाय, 90W फ्लॅशचार्जसह, 30W वायरलेस चार्जिंग हा स्मार्टफोन सपोर्ट करतो.

विवो X200 प्रो मध्ये मल्टीफंक्शनल NFC, GPS, ब्लूटूथ 5.4, Wi-Fi 6, Wi-Fi 7, आणि USB 3.2 Gen 1 सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

विवो X200 प्रो IP68 आणि IP69 रेटिंगमुळे पाणी आणि धुळीपासून हा स्मार्टफोन सुरक्षित आहे.

विवो X200 प्रो ची भारतात किंमत – VIVO X200 Pro Price in India

विवो X200 प्रो टायटेनिअम ग्रे आणि कॉसमॉस ब्लॅक या दोन कलर मध्ये भारतीय बाजारात उपलब्ध असणार आहे. विवो X200 प्रो मध्ये १६GB रॅम + ५१२GB मेमरी असलेलं एकच मॉडेल असणार आहे. या मॉडेल ची किंमत ९४,९९९/- ठेवण्यात आली आहे. विवो च्या अधिकृत वेबसाईट वरून किंवा फ्लिपकार्ट/अमॅझॉन वर जाऊन तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहात. हा स्मार्टफोन EMI वर सुद्धा घेता येणार आहे. ३,९५८/- पासून EMI सुरु होणार आहे.

*कृपया लक्षात ठेवा की किमतींमध्ये कालांतराने चढ-उतार होऊ शकतात.

विवो X200 प्रो 5G भारतात लॉन्च होण्याची तारीख – VIVO X200 Pro Launch Date in India

VIVO X200 Pro १२ डिसेंबर २०२४ पासून विवो च्या अधिकृत वेबसाईटवर आणि फ्लिपकार्ट/अमॅझॉन वर हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे.

FAQ:

विवो X200 प्रो ची भारतात किंमत – VIVO X200 Pro Price in India?

विवो X200 प्रो टायटेनिअम ग्रे आणि कॉसमॉस ब्लॅक या दोन कलर मध्ये भारतीय बाजारात उपलब्ध असणार आहे. विवो X200 प्रो मध्ये १६GB रॅम + ५१२GB मेमरी असलेलं एकच मॉडेल असणार आहे. या मॉडेल ची किंमत ९४,९९९/- ठेवण्यात आली आहे. विवो च्या अधिकृत वेबसाईट वरून किंवा फ्लिपकार्ट/अमॅझॉन वर जाऊन तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहात. हा स्मार्टफोन EMI वर सुद्धा घेता येणार आहे. ३,९५८/- पासून EMI सुरु होणार आहे.

विवो X200 प्रो कॅमेरा – VIVO X200 Pro Camera?

विवो X200 प्रो चा प्राथमिक कॅमेरा २०० मेगापिक्सेल चा ZEISS APO टेलिफोटो कॅमेरा असून ५० ZEISS ट्रू कलर मेन कॅमेरा आणि ५० मेगापिक्सेल चा अल्ट्रा वाईड कॅमेरा असा ट्रिपल कॅमेरा सेटअप या स्मार्टफोन मध्ये देण्यात आला आहे. सोबतच ३२ मेगापिक्सेल चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोन मध्ये 4K 60FPS HDR डॉल्बी व्हिजन, 4K HDR सिनेमॅटिक पोर्ट्रेट व्हिडिओ, 120FPS स्लो-मोशन रेकॉर्ड करता येणार आहेत. 

हे वाचा: POCO X6 Pro 5G: एक हाय स्पीड स्मार्टफोन, किंमत?

ही पोस्ट शेअर करा: