PM Vishwakarma Yojana: १५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र दिनानिमित्त आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना, लहान उद्योजकांसाठी विश्वकर्मा योजनेची (Vishwakarma Yojana) घोषणा केली. आणि १६ ऑगस्ट २०२३ रोजी या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. विश्वकर्मा ही योजना १७ सप्टेंबर २०२३ पासून लागू झाली आहे. या दिवशी भगवान विश्वकर्मा यांची जयंती असते.
Table of Contents
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे? What is Vishwakarma Yojana?
विश्वकर्मा योजनेचा (Vishwakarma Yojana) खरा उपयोग हा पारंपारिक कौशल्य असलेल्या कारागिरांना आर्थिक मदत म्हणून होणार आहे. यामध्ये लोहार, कुंभार, चांभार, धोबी, मिस्त्री, विणकर, मुर्तीकार, शिल्पकार यांसारख्या १८ प्रकारचे पारंपारिक कौशल्य असलेल्या कारागिरांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत ठरलेल्या अटींनुसार एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. विश्वकर्मा योजनेसाठी भारत सरकारच्या वतीने १३००० कोटी रुपये इतका निधी दिला जाणार आहे.
विश्वकर्मा योजनेअंतर्गत (Vishwakarma scheme) ३० लाख पारंपारिक कारागिरांना मदत करण्यात येईल. विश्वकर्मा योजनेअंतर्गत एका कुटुंबातील एकच व्यक्ती ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत कारागिरांना स्वस्त व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच टक्के व्याजदराने एक लाख रुपये इतके कर्ज दिले जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कर्जाची रक्कम २ लाखापर्यंतचे वाढवली जाईल. त्याचसोबत कारागिरांना विश्वकर्मा सर्टिफिकेट तसेच आयडेंटिटी कार्ड देखील दिले जाणार आहे.
विश्वकर्मा योजनेअंतर्गत (Vishwakarma Yojana) पारंपारिक कारागिरांना आधुनिक स्वरूपाची उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत देखील शासन करणार आहे. हि आर्थिक मदत १५ हजार रुपये पर्यंत असणार आहे.
विश्वकर्मा योजनेसाठी कुठले कारागिर पात्र ठरणार? – Vishwakarma yojana eligibility
खाली दिलेले १८ प्रकारचे पारंपारिक कारागीर या विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊ शकतील.
- फिशिंग नेट बनवणारे
- शिंपी
- धोबी
- हार घालणारा. (मलाकार)
- न्हावी
- बाहुली आणि खेळणी बनवणारे (पारंपारिक)
- बास्केट / चटई / झाडू बनवणारे / कॉयर विणकर.
- मेसन. (राजमिस्त्री)
- मोची (चार्मकर) / चपला / पादत्राणे कारागीर
- शिल्पकार (मूर्तिकर, स्टोन कार्व्हर), स्टोन ब्रेकर
- कुंभार
- सोनार
- लॉकस्मिथ
- हॅमर आणि टूल किट बनवणारे
- लोहार
- आर्मरर
- बोट (नाव) बनवणारे
- सुतार
विश्वकर्मा योजनेचा उद्देश्य – Vishwakarma Yojana scheme
विश्वकर्मा योजनेअंतर्गत (Vishwakarma Yojana) कारागिरांना मदत करणे आणि या कारागिरांच्या उत्पादनांचा आणि सेवांचा दर्जा सुधारणे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे हा यामागचा उद्देश्य आहे. या योजनेअंतर्गत कारागिर तसेच शिल्पकार यांच्यासाठी बेसिक अणि ॲडव्हान्स अशा दोन प्रकारच्या कौशल्य विकास अभ्यासक्रम आयोजित केले जातील.
त्याचसोबत कारागिरांना विश्वकर्मा सर्टिफिकेट तसेच आयडेंटिटी कार्ड देखील दिले जाणार आहे. कुशल तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासोबत कारागिरांना विद्यावेतन देखील प्राप्त होणार आहे. शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणारा हा कोर्स करण्यासाठी कौशल्य आधारित कारागिरांना ५००/- रुपये रोज इतका स्टायपॅड देखील देण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना अनेक योजनांची घोषणा केली यामधलीच एक विश्वकर्मा योजना (Vishwakarma scheme).
विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी पुढील अटी वाचा:
- अर्जदार भारतीय रहिवाशी असावा.
- अर्जदार कारागीर असावा.
- अर्जदाराचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
- अर्जदाराने पीएमईजीपी, पीएम स्वनिधी किंवा मुद्रा कर्जाचा लाभ घेतलेला नसावा.
विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत – Vishwakarma Yojana documents required
- आधार कार्ड.
- मतदार ओळखपत्र
- व्यवसायाचा पुरावा
- मोबाईल नंबर
- बँक खाते तपशील
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला (लागू पडत असल्यास)
विश्वकर्मा योजनेचा लाभ कसा मिळणार? – Vishwakarma Yojana online registration
या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://pmvishwakarma.gov.in/ या संकेत स्थळाला भेट द्या.
FAQ:
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे? What is PM Vishwakarma Yojana?
विश्वकर्मा योजनेचा (Vishwakarma Yojana) खरा उपयोग हा पारंपारिक कौशल्य असलेल्या कारागिरांना आर्थिक मदत म्हणून होणार आहे. यामध्ये लोहार, कुंभार, चांभार, धोबी, मिस्त्री, विणकर, मुर्तीकार, शिल्पकार यांसारख्या १८ प्रकारचे पारंपारिक कौशल्य असलेल्या कारागिरांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत ठरलेल्या अटींनुसार एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. विश्वकर्मा योजनेसाठी भारत सरकारच्या वतीने १३००० कोटी रुपये इतका निधी दिला जाणार आहे.
विश्वकर्मा योजनेसाठी कुठले कारागिर पात्र ठरणार? – Vishwakarma yojana eligibility
१८ प्रकारचे पारंपारिक कारागीर या विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊ शकतील. अर्जदार भारतीय रहिवाशी असावा, अर्जदार कारागीर असावा, अर्जदाराचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे आणि अर्जदाराने पीएमईजीपी, पीएम स्वनिधी किंवा मुद्रा कर्जाचा लाभ घेतलेला नसावा.
विश्वकर्मा योजना अधिकृत वेबसाइट? – Vishwakarma Yojana Official Website?
विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करताना कुठली कागदपत्रे आवश्यक आहेत? Vishwakarma Yojana documents required?
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, व्यवसायाचा पुरावा, मोबाईल नंबर, बँक खाते तपशील, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला (लागू पडत असल्यास).