Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY): काय आहे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY): आपल्या भारतात अशा खूप गरीब महिला आहेत ज्यांना आपलं घर चालवण्यासाठी मजुरीची काम करावी लागतात. त्यामुळे ज्या परिस्थितीत आपलं पोट भरण अवघड असतं तिथे एक नवा जीव जन्माला घालणं त्यांला खूप अवघड वाटत. पण आता आपल्या ह्या अशा महिलांसाठी आपल्या प्रधानमंत्रीनी एक खास योजना आणली आहे ज्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना.

ह्या योजने अंतर्गत आपल्या गरीब महिलांना त्यांच्या गर्भारपणात स्वतःसाठी आणि बाळासाठी योग्य आहार घेता यावा या अर्थाने हि योजना राबवण्यात येत आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (Pradhan Mantri Matru Vandana Yojana) ह्या योजने अंतर्गत महिलांना ५०००/- रुपयां पर्यंतीची मदत मिळू शकते.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचि सुरवात १ जानेवारी २०१७ पासून करण्यात आली. मातृ वंदना योजना केंद्र शासनाच्या महिला व बालविकास आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आली आहे. ह्या योजनेत केंद्र शासनाचा ६०% आणि राज्य शासनाचा ४०% सहभाग आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना (Pradhan Mantri Matru Vandana Yojana) ह्या योजनेचा खरा उद्देश्य म्हणजे गर्भवती महिलांना त्यांच्या गरोदर पणाच्या दिवसांत लागणाऱ्या पैशांसाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे हा आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत दिली जाणारी रक्कम महिलांच्या बँक खात्यात DBT( Direct Benifit Transfer ) च्या सहाय्याने जमा करण्यात येते.

खाली दिलेल्या माहितीप्रमाणे लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल:

पहिला हप्ता: १०००/- रुपये गर्भारपणाची नोंद केली गेल्यावर
दुसरा हफ्ता: २०००/- रुपये गर्भारपणाची सहाव्या महिन्याची तपासणी झाल्यावर
तिसरा हप्ता: २०००/- रुपये बालकाचा जन्म झाल्यावर, जेव्हा बालकाला BCG, OPV , DPT आणि Hepatitis – B अशाप्रकारच्या लस बालकाला देण्यास सुरवात झाल्यावर.
*गर्भपात झाल्यास लाभार्थी भविष्यात गर्भधारणा झाल्यास उर्वरित हप्त्यांवर दावा करण्यास पात्र असेल.

मातृ वंदना योजना लाभांचा दावा करण्यासाठी LMP तारीख अनिवार्य आहे. LMP तारखेपासून 150 दिवसांच्या आत MCP कार्डमध्ये नोंद करणे आवश्यक आहे. त्यानंतर, LMP तारखेपासून ७३० दिवसांच्या आत ती अंगणवाडी केंद्र किंवा ASHA/ANM मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकते. LMP तारीख १ एप्रिल २०१६ पूर्वीची असल्यास PMMVY अंतर्गत मातृत्व लाभ मिळणार नाही. MCP कार्डमध्ये लाभार्थीच्या नोंदणीची तारीख पात्र होण्यासाठी LMP तारखेपासून 150 दिवसांच्या आत असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ खाजगी रुग्णालयांमध्ये मिळणार नाही, फक्त सरकारी रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ मिळेल. MCP कार्डावर नोंद केल्यावर लाभार्थी पहिल्या हप्त्यावर दावा करू शकतो. १८० दिवसांनंतर लाभार्थी दुसऱ्या हप्त्यावर दावा करू शकतो. बालकाचा जन्म झाल्यावर लाभार्थी तिसऱ्या हप्त्यावर दावा करू शकतो.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा (Pradhan Mantri Matru Vandana Yojana) लाभ खालील श्रेणीतील महिला घेऊ शकत नाहीत :

१) ज्या महिला केंद्र किंवा राज्य सरकार किंवा कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात नोकरी करत आहेत.
२) जी महिला इतर कोणत्याही योजना किंवा कायद्यांतर्गत समान लाभांचा प्राप्तकर्ता आहे.

FAQ:

PMMVY योजनेअंतर्गत लाभार्थी कधी हप्त्यावर दावा करू शकतो? When can beneficiary claim installment under PMMVY scheme?

LMP तारखेपासून 150 दिवसांच्या आत MCP कार्डमध्ये नोंद करणे आवश्यक आहे. MCP कार्डावर नोंद केल्यावर लाभार्थी पहिल्या हप्त्यावर दावा करू शकतो. १८० दिवसांनंतर लाभार्थी दुसऱ्या हप्त्यावर दावा करू शकतो. बालकाचा जन्म झाल्यावर लाभार्थी तिसऱ्या हप्त्यावर दावा करू शकतो.

PMMVY योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही? Who will not benefit from PMMVY scheme?

LMP तारीख १ एप्रिल २०१६ पूर्वीची असल्यास Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) अंतर्गत मातृत्व लाभ मिळणार नाही. ज्या महिला केंद्र किंवा राज्य सरकार किंवा कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात नोकरी करत आहेत. जी महिला इतर कोणत्याही योजना किंवा कायद्यांतर्गत समान लाभांचा प्राप्तकर्ता आहे.

LMP तारीख म्हणजे काय? What is LMP date?

शेवटची मासिक पाळी ची तारीख म्हणजेच LMP तारीख. मातृ वंदना योजना लाभांचा दावा करण्यासाठी LMP तारीख अनिवार्य आहे. LMP तारखेपासून 150 दिवसांच्या आत MCP कार्डमध्ये नोंद करणे आवश्यक आहे. त्यानंतर, LMP तारखेपासून ७३० दिवसांच्या आत ती अंगणवाडी केंद्र किंवा ASHA/ANM मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकते. LMP तारीख १ एप्रिल २०१६ पूर्वीची असल्यास PMMVY अंतर्गत मातृत्व लाभ मिळणार नाही.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना काय आहे? What is Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY)?

ह्या योजने अंतर्गत आपल्या गरीब महिलांना त्यांच्या गर्भारपणात स्वतःसाठी आणि बाळासाठी योग्य आहार घेता यावा या अर्थाने हि योजना राबवण्यात येत आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (Pradhan Mantri Matru Vandana Yojana) ह्या योजने अंतर्गत महिलांना ५०००/- रुपयां पर्यंतीची मदत मिळू शकते.

हे वाचा: Vishwakarma Yojana – जाणून घ्या काय आहे विश्वकर्मा योजना

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment