अण्णासाहेब पाटील कर्ज योजना १५ लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज जाणून घ्या काय आहेत अटी

एका व्यक्तीला फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.

दिव्यांगांकरिता अर्ज दाखल करत असल्यास दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदारास जातीचा दाखला, पॅन कार्ड, रेशनकार्डची प्रत अपलोड करणे अनिवार्य आहे.

अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असणे गरजेचे आहे.

व्यावसायिक कर्जासाठी उद्योग आधाराची प्रत अपलोड करणे अनिवार्य आहे.

अर्जदाराची कोणत्याही बँकेत थकबाकी नसावी.

लाभार्थ्याने नियमित कर्जाची परतफेड केली नाही तर त्यास व्याज परतावा मिळणार नाही.

गट प्रकल्प योजनेअंतर्गत किमान एक भागीदार कमीत कमी इयत्ता १०वी उत्तीर्ण झालेला असावा.

या योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणारा व्यवसाय हा पूर्णपणे महाराष्ट्र राज्यात असणे बंधनकारक आहे.