Toyota Hilux Champ: टोयोटा हिलक्स पिकअप ट्रकला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. हिलक्स पिकअप ट्रकचा चाहता वर्ग जरी हिची किंमत जास्त असली तरी हिलाच पसंती देतो. हेच लक्षात घेऊन टोयोटाने Hilux Champ नावाने स्वस्त मॉडेल बाजारात आणले आहे. सुरवातीला हा पिकअप ट्रक थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
Table of Contents
हिलक्स चॅम्प (Hilux Champ) पिकअप ट्रक IMV 0 प्लॅटफॉर्मवर बनवण्यात येत आहे जो आधीच्या IMV प्लॅटफॉर्म पेक्षा स्वस्त आहे. सध्याच्या हिलक्स (Hilux), इनोवा क्रिस्टा (Innova Crysta) आणि फॉर्च्युनर (Fortuner) या गाड्या IMV प्लॅटफॉर्म बनलेल्या आहेत. हिलक्स चॅम्प (Hilux Champ) पिकअप ट्रक IMV 0 प्लॅटफॉर्मवर बनवण्यात येणारे पहिले मॉडेल असेल. त्यानंतर पिकअप ट्रक, मिनीव्हॅन आणि SUV सह विविध मॉडेल्सना IMV 0 प्लॅटफॉर्मवर बनवण्यात येईल.
थायलंडमध्ये हिलक्स चॅम्प (Toyota Hilux Champ) पिकअप ट्रक च्या बुकिंग ला सुरुवात झाली आहे. या पिकअप ट्रकची थायलंडमध्ये किंमत अंदाजे रु. 10.90 ते 13.70 लाख दरम्यान ठेवण्यात आली आहे.
Toyota Hilux Champ: Exterior Design & dimensions
हिलक्स चॅम्प (Toyota Hilux Champ) दिसायला आधीच्या हिलक्स पेक्षा वेगळा आहे. हिलक्स चॅम्प एका रेट्रो क्लासिक पिकअप ट्रकसारखा आहे. हिलक्स चॅम्प हा Hilux Champ SWB आणि Hilux Champ LWB अश्या २ वेगवेगळ्या व्हीलबेस मध्ये असणार आहे. Hilux Champ SWB या पिकअपची लांबी 4,900mm, रुंदी 1,800mm, उंची 1,800mm, ग्राउंड क्लीयरन्स 180mm आणि व्हीलबेस 2,750mm चा असणार आहे तर Hilux Champ LWB या पिकअपची लांबी 5,300mm, रुंदी 1,800mm, उंची 1,800mm, ग्राउंड क्लीयरन्स 180mm आणि व्हीलबेस 3,085mm चा असणार आहे.
Toyota Hilux Champ: Features & specs
हिलक्स चॅम्प (Toyota Hilux Champ) ची किंमत कमी असल्यामुळे केबिन इंटिरियर्स मध्ये इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळणार नाही. अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एसी व्हेंट्स, पॉवर विंडो, दोन कप होल्डर आणि काही स्टोरेज एरिया यामध्ये मिळतील. ज्या ग्राहकाला काही बदल करायचा असेल तर तो आफ्टर मार्केट ऍक्सेसरी बसवून घेता येतील.
हिलक्स चॅम्प (Toyota Hilux Champ) मध्ये २.० -लिटर पेट्रोल, २.७-लिटर पेट्रोल आणि २.४-लिटर डिझेल असे ३ इंजिन पर्याय उपलब्ध असणार आहेत. २.०-लिटर पेट्रोल इंजिन ३८ bhp आणि १८३ Nm टॉर्क निर्माण करेल, २.७-लिटर पेट्रोल इंजिन १६६ bhp आणि २४५ Nm टॉर्क निर्माण करेल आणि २.४-लिटर डिझेल इंजिन १४८ bhp आणि ३५०/४०० Nm टॉर्क निर्माण करेल. तीनही इंजिन मध्ये ५-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध असेल.
टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner) होणार स्वस्त?
भारतामध्ये टोयोटा फॉर्च्युनरचा (Toyota Fortuner) चाहता वर्ग खूप मोठा आहे. अनेक नेत्यांपासून ते श्रीमंतांना टोयोटा फॉर्च्युनरचा नाद आहे. सामान्यांना देखील या कारचा लोभ आहे परंतु सामन्यांना ती तिच्या किमतीमुळे परवडत नाही पण आता IMV 0 या बॉडी-ऑन-फ्रेम प्लॅटफॉर्म मुळे भारतीयांना सर्वात जास्त आवडणारी फॉर्च्युनर हि कार परवडणाऱ्या किमतीत मिळू शकेल. सध्या फॉर्च्युनरची एक्स-शोरूम किंमत ३३.४३ लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडेल ५१.४४ लाखांपर्यंत जाते. लोकांना परवडणारी फॉर्च्युनर जर भारतात आली तर टोयोटासाठी देखील हे फायद्याचे ठरू शकेल.
FAQ:
हिलक्स चॅम्पची लांबी आणि रुंदी? What are the specs of the Hilux Champ?
हिलक्स चॅम्प हा Hilux Champ SWB आणि Hilux Champ LWB अश्या २ वेगवेगळ्या व्हीलबेस मध्ये असणार आहे. Hilux Champ SWB या पिकअपची लांबी 4,900mm, रुंदी 1,800mm, उंची 1,800mm, ग्राउंड क्लीयरन्स 180mm आणि व्हीलबेस 2,750mm चा असणार आहे तर Hilux Champ LWB या पिकअपची लांबी 5,300mm, रुंदी 1,800mm, उंची 1,800mm, ग्राउंड क्लीयरन्स 180mm आणि व्हीलबेस 3,085mm चा असणार आहे.
हिलक्स चॅम्पची किंमत किती आहे? What is the price of a Toyota Hilux Champ?
थायलंडमध्ये हिलक्स चॅम्प (Toyota Hilux Champ) पिकअप ट्रक च्या बुकिंग ला सुरुवात झाली आहे. या पिकअप ट्रकची थायलंडमध्ये किंमत अंदाजे रु. 10.90 ते 13.70 लाख दरम्यान ठेवण्यात आली आहे.
हिलक्स चॅम्प किती इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असणार? Toyota Hilux Champ engine specs?
हिलक्स चॅम्प (Toyota Hilux Champ) मध्ये २.० -लिटर पेट्रोल, २.७-लिटर पेट्रोल आणि २.४-लिटर डिझेल असे ३ इंजिन पर्याय उपलब्ध असणार आहेत. २.०-लिटर पेट्रोल इंजिन ३८ bhp आणि १८३ Nm टॉर्क निर्माण करेल, २.७-लिटर पेट्रोल इंजिन १६६ bhp आणि २४५ Nm टॉर्क निर्माण करेल आणि २.४-लिटर डिझेल इंजिन १४८ bhp आणि ३५०/४०० Nm टॉर्क निर्माण करेल. तीनही इंजिन मध्ये ५-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध असेल.