Sam Bahadur Review: सॅम बहादूर विकी कौशलचा उत्कृष्ट अभिनय असलेला चित्रपट!

Sam Bahadur Box Office Collection

Sam Bahadur Review: गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा असलेल्या दिग्दर्शक मेघना गुलजार यांचा सॅम बहादूर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विक्की कौशलची (Vicky Kaushal) प्रमुख भूमिका असलेल्या सॅम बहादूरने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडत चांगली सुरुवात केली आहे.

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ देखील १ डिसेंबर ला रिलीज झाल्यामुळे ‘सॅम बहादूर’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Sam Bahadur Box Office Collection) किती होणार या कडे सगळ्यांचे लक्ष होते. पण दमदार कथा आणि विकी कौशलच्या दमदार अभिनयामुळे ‘सॅम बहादूर’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. सोशल मीडियावर सॅम बहादूर चित्रपटाचे सर्वजण कौतुक करत आहेत. सॅकनिल्कच्या अंदाजे आकडेवारीनुसार, मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादूर’ने पहिल्याच दिवशी सुमारे ५.५० कोटी रुपयांची कमाई (Sam Bahadur Box Office Collection) केली आहे. 

विकी कौशलच्या या आधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या पहिल्या दिवशीच्या कमाईच्या तुलनेत ‘सॅम बहादूर’ ने बाजी मारली आहे. याआधी विकी कौशल ने “उरी-सर्जिकल स्ट्राइक”, “राझी”, “जरा हटके जरा बचके” आणि “भूत” या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यातील एका चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होताना आपण बघितला आहे परंतु “सॅम बहादूर” च्या बाबतीत सध्या तरी असे होताना दिसत नाही आहे. 

Who is Sam Manekshaw सॅम माणेकशॉ कोण होते?

Who is Sam Manekshaw

विकी कौशल चा सॅम बहादूर (Sam Bahadur) हा चित्रपट देशातील पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. सॅम माणेकशॉ यांनी पूर्व पाकिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करून बांगलादेशची स्थापना करून भारताला बळकट करण्यात इंदिरा गांधींसोबत महत्त्वाची भूमिका बजावली होती. ब्रिटीश राजवटीपासून म्हणजे भारत आणि पाकिस्तान एक देश असल्यापासून सॅम माणेकशॉ हे सेवेत होते. १९७१ च्या आधीच्या युद्धांमध्ये देखील सॅम माणेकशॉ यांनी आपला पराक्रम गाजवला होता. सॅम माणेकशॉ यांनी त्यांच्या चाळीस वर्षांच्या सेवेत दुसऱ्या महायुद्धापासून ते १९६२ च्या भारत-चीन युद्धापर्यंत अनेक मोठ्या लढायांमध्ये देशाला विजय मिळवून दिला आहे. 

सॅम बहादूर (Sam Bahadur) हा चित्रपट का पाहावा?

विकी कौशलने सॅम बहादूरची भूमिका साकारण्यासाठी किती मेहनत घेतली असावी हे चित्रपट पाहताना आपल्याला येते. विकी कौशलला पाहताना आपल्यासमोर सॅम माणेकशॉ खरेखुरे समोर असल्याचा भास होतो यातच विकी कौशलने लोकांची मन जिंकून घेतली आहेत. लष्करी अधिकाऱ्याचा अधिकार, दूरदृष्टी, निर्णय घेण्याची क्षमता, वागणूक आणि संभाषणाची शैली या सर्वच बाबी विकी कौशलने हुबेहुब निभावल्या आहेत. 

चित्रपट सैन्य, युद्ध यांसारख्या विषयांवर असला तरी तुम्हांला कंटाळवाणा वाटणार नाही याची खबरदारी लेखकाने घेतली आहे. चित्रपटात युद्धसदृश परिस्थिती असतानाही अनेक प्रसंगात आपण मनमोकळेपणाने हसाल. युद्ध आणि लष्करी शिस्त यांच्या दरम्यान चे विनोदी किस्से चित्रपटात उत्कृष्ट पद्धतीने दाखविले आहेत. सॅम माणकेशॉ यांची विनोदबुद्धी चांगल्या प्रकारे मांडण्यात दिग्दर्शिका मेघना गुलजार यशस्वी झाल्या आहेत. चित्रपटातील एका प्रसंगात पंतप्रधान इंदिरा गांधींना सॅम माणकेशॉ “स्वीटी” संभोधतात तेव्हा हसायला आपल्याला आवरत नाही. शरीरात नऊ गोळ्या लागल्यावरही सॅम माणकेशॉ हसत असतात हे असा प्रसंग चित्रपटात आहे. 

आता जरा चित्रपटाच्या दुसऱ्याबाजूकडे देखील बघूया. काही गोष्टी खटकणाऱ्या आहेत ज्यामध्ये पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांचा राजकारणाच्या जगात किती उंची आहे, हे चित्रपटात दाखवले गेले नाही. विकी कौशल सोडून इतर स्टारकास्टकडे विशेष लक्ष दिले गेले नाही हे जाणवते. चित्रपटात सॅम बहादूरच्या पत्नीची भूमिका सान्या मल्होत्रा ने केली आहे. तर इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh), पंडित नेहरू यांच्या भूमिकेत नीरज काबी आणि याह्या खान यांच्या भूमिकेत मोहम्मद झीशान यांनी भूमिका साकारल्या आहेत. 

युद्धाची दृश्ये दाखवताना दिग्दर्शन कमी पडल्याचे जाणवते. परंतु विकी कौशलच्या अभिनयाने मेघना गुलजारच्या दिग्दर्शनातील काही उणिवा झाकल्या गेल्या आहेत. विकी कौशलने चित्रपटाच्या शेवटपर्यंत त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे. 

प्रत्येकाने एकदा तरी कुटुंबासोबत पाहण्यासारखा “सॅम बहादूर” (Sam Bahadur) हा चित्रपट आहे असे आम्हांला वाटते. सैन्य आणि युद्धांवर आधारित चित्रपट ज्यांना आवडत असतील अश्यां लोंकानी तर हा नक्कीच पाहावा. देशाच्या भूतकाळाबद्दल तुमचे ज्ञान अजून भक्कम करणारा असा हा चित्रपट आहे. तुमच्या मुलांना देशासाठी अनेक युद्धांमध्ये योगदान दिलेल्या एका महानायकची ओळख करून देता येईल.

FAQ:

सॅम माणेकशॉ यांच्यावर आधारित कोणता चित्रपट आहे? Which movie is based on Sam Manekshaw?

विकी कौशल चा सॅम बहादूर (Sam Bahadur) हा चित्रपट देशातील पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. सॅम माणेकशॉ यांनी पूर्व पाकिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करून बांगलादेशची स्थापना करून भारताला बळकट करण्यात इंदिरा गांधींसोबत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सॅम बहादूर (Sam Bahadur) हा चित्रपट का पाहावा? Why watch sam bahadur movie?

विकी कौशलने सॅम बहादूरची भूमिका साकारण्यासाठी किती मेहनत घेतली असावी हे चित्रपट पाहताना आपल्याला येते. विकी कौशलला पाहताना आपल्यासमोर सॅम माणेकशॉ खरेखुरे समोर असल्याचा भास होतो यातच विकी कौशलने लोकांची मन जिंकून घेतली आहेत. लष्करी अधिकाऱ्याचा अधिकार, दूरदृष्टी, निर्णय घेण्याची क्षमता, वागणूक आणि संभाषणाची शैली या सर्वच बाबी विकी कौशलने हुबेहुब निभावल्या आहेत. 

हे वाचा: Allu Arjun Pushpa 2 Fees: अल्लू अर्जुनने “पुष्पा २” साठी मानधन घेतले नाही, परंतु तो कमवणार करोडो रुपये!

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment