Redmi 13C 5G: Xiaomi ची उपकंपनी असलेल्या Redmi ने त्यांच्या ‘C’ सिरीज मध्ये Redmi 13C 4G आणि Redmi 13C 5G हे स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत. या स्मार्टफोनची किंमत सर्वांना परवडणारी अशी असणार आहे. 5G बजेट सेगमेंट फोनमध्ये 50MP कॅमेरा सह 5,000mAh बॅटरी देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. Redmi 12 5G कडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे, Xiaomi ने Redmi 13C 5G हा स्वस्त दरात स्मार्टफोन घेऊन येत आहे.
Table of Contents
“आजच्या डिजिटल युगात 5G ची लाट सुरु आहे. आम्ही २०२३ मध्ये Redmi 12 ने या 5G मध्ये प्रवेशकरून चांगली कामगिरी बजावत यश प्राप्त केले आहे. आता २०२४ मध्ये जात असताना 5G तंत्रज्ञानासह भारताला सक्षम बनवण्याच्या आमच्या ध्येयाकडे आणखी एक महत्त्वाची झेप म्हणजेच आमचा Redmi 13C 5G आहे.” असे Xiaomi इंडियाचे अध्यक्ष मुरलीकृष्णन बी यांनी सांगितले.
जाणून घ्या या Redmi च्या 4G स्मार्टफोन बद्दल – Redmi 13C 4G Price, Specifications, features
13C 4G मध्ये तीन व्हेरियंट असणार आहेत. 4GB+128GB, 6GB+128GB आणि 8GB+256GB. 4GB+128GB ची किंमत ८,९९९ रुपये असणार आहे. 6GB+128GB ची किंमत ९,९९९ रुपये असणार आहे. 8GB+256GB ची किंमत ११,४९९ रुपये असणार आहे. हा स्मार्टफोन Android 13 असणार आहे. प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर 13C 4G मध्ये MediaTek Helio G85 हा प्रोसेसर असणार आहे. या प्रोसेसरमुळे तुमचे दैनंदिन काम आणि मध्यम गेमिंग तुम्ही करू शकाल. या स्मार्टफोन च्या 6.74″ LCD डिसप्ले मध्ये HD+ रिझोल्यूशनसह 90Hz चा रिफ्रेश रेट असणार आहे.
13C 4G मध्ये 50MP + 2MP ड्युअल-कॅमेरा सेटअप सोबतच 8MP चा फ्रंट सेल्फी कॅमेरा आहे. या स्मार्टफोन मध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी आहे परंतु या स्मार्टफोन सोबत 10W चा चार्जर मिळणार आहे. सोबतच फिंगरप्रिंट सेन्सर मिळणार आहे.
जाणून घ्या या Redmi च्या 5G स्मार्टफोन बद्दल – Redmi 13C 5G Price, Specifications, features
13C 5G मध्ये देखील Redmi 13C 4G प्रमाणे तीन व्हेरियंट असणार आहेत. 4GB+128GB, 6GB+128GB आणि 8GB+256GB. 4GB+128GB ची किंमत १०,९९९ रुपये असणार आहे. 6GB+128GB ची किंमत १२,४९९ रुपये असणार आहे. 8GB+256GB ची किंमत १४,४९९ रुपये असणार आहे. हा स्मार्टफोन देखील Android 13 असणार आहे. याच्या प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर 13C 5G मध्ये MediaTek Dimensity 6100+ हा प्रोसेसर असणार आहे. या प्रोसेसरमुळे तुमचे दैनंदिन काम आणि मध्यम गेमिंग तुम्ही करू शकाल. या स्मार्टफोन च्या 6.74″ LCD डिसप्ले मध्ये HD+ रिझोल्यूशनसह 90Hz चा रिफ्रेश रेट असणार आहे. हा स्मार्टफोन तुम्हांला 5G चा उत्तम अनुभव देईल.
13C 5G मध्ये Redmi 13C 4G प्रमाणेच 50MP + 2MP ड्युअल-कॅमेरा सेटअप सोबतच 8MP चा फ्रंट सेल्फी कॅमेरा आहे. या स्मार्टफोन मध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी आहे परंतु या स्मार्टफोन सोबत 10W चा चार्जर मिळणार आहे. सोबतच फिंगरप्रिंट सेन्सर मिळणार आहे.
लाँच ऑफर (Launch offer) Discount on Redmi 13C
हा स्मार्टफोन तुम्ही Mi.com, Xiaomi Retail आणि Amazon द्वारे खरेदी करू शकता. जर तुम्ही ICICI बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वरून Redmi चा हा स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हांला १००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे.
हा स्मार्टफोन कधी पासून विकत मिळणार ? Launching date of Redmi 13C
12 डिसेंबरपासून “Redmi 13C 4G” विक्रीसाठी उपलब्ध असेल तर “Redmi 13C 5G” 16 डिसेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Redmi नेहमीच लोकांना परवडणाऱ्या किंमतीत फीचरने भरलेले स्मार्टफोन बाजारात आणत असते. कुठल्याही फीचरमध्ये तडजोड न करता उत्तम 5G स्मार्टफोनचा पर्याय Redmi ने लोकांसमोर आणला आहे. लोकांना त्यांच्या बजेटमध्ये बसेल असा हा Redmi चा स्मार्टफोन आहे.
FAQ:
Redmi 13C हा स्मार्टफोन बाजारात कधी आला? What is Launching date of Redmi 13C?
12 डिसेंबरपासून “Redmi 13C 4G” विक्रीसाठी उपलब्ध असेल तर “Redmi 13C 5G” 16 डिसेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Redmi 13C 5G स्मार्टफोन ची किंमत? Redmi 13C 5G Price?
13C 5G मध्ये देखील Redmi 13C 4G प्रमाणे तीन व्हेरियंट असणार आहेत. 4GB+128GB, 6GB+128GB आणि 8GB+256GB. 4GB+128GB ची किंमत १०,९९९ रुपये असणार आहे. 6GB+128GB ची किंमत १२,४९९ रुपये असणार आहे. 8GB+256GB ची किंमत १४,४९९ रुपये असणार आहे.