Mahindra XUV300 Flex Fuel: कमी खर्च आणि जास्त माइलेज देणारी कार

Mahindra XUV300 Flex Fuel Mileage

Mahindra XUV300 Flex Fuel: भारतात महिंद्रा कंपनीच्या गाड्या त्यांच्या लुक साठी आणि फिचर्स मुळे लोकप्रिय आहेत. महिंद्रा कंपनी देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या कार मध्ये नवीन नवीन बदल करत असते. तसाच एक बदल घेऊन नवीन Mahindra XUV300 Flex Fuel हि कार भारतात लवकरच लॉन्च होणार आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२४ मध्ये महिंद्राकडून Mahindra XUV300 Flex Fuel कर बद्दल माहिती देण्यात आली आहे. 

Mahindra XUV300 Flex Fuel हि कार ८५% इथेनॉल आणि १५% पेट्रोलवर वर चालणार आहे. पेट्रोल आणि डिझेल च्या तुलनेत इथेनॉल कमी प्रदूषण करते त्यामुळेच  इथेनॉल वर चालणाऱ्या कार बनवण्याचा निर्णय दिग्गज कंपन्यांकडून केला जात आहे. महिंद्राने देखील एक पाऊल पुढे टाकत या कारचे उत्पादन केले आहे. महिंद्राकडून अद्याप हि कार भारतात कधी लॉन्च होणार याची अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी सूत्रांच्या माहिती नुसार २०२५ मध्ये हि कार भारतात लॉन्च केली जाऊ शकते. 

Mahindra XUV300 Flex Fuel हि कार दिसायला Mahindra XUV300 प्रमाणेच असणार आहे. परंतु इंटीरियर आणि बाहेरील डिसाईन मध्ये थोडे फार बदल केले जाऊ शकतात. आपण जर सध्याच्या महिंद्रा XUV300 बदल माहिती घेतली तर थोडा अंदाज आपल्याला नवीन Mahindra XUV300 Flex Fuel बदल येऊ शकेल.  जाणून घेऊयात सध्या जी महिंद्रा XUV300 भारतात विकली जाते त्यामध्ये काय काय फिचर्स येतात आणि तिची किंमत किती आहे. 

महिंद्रा XUV300 फिचर्स – Mahindra XUV300 Flex Fuel Features

महिंद्रा XUV300 मध्ये तब्बल १९ व्हेरियंट येतात. या व्यतिरिक्त EV मध्ये देखील हि कार येते जी XUV400 म्हणून भारतात विकली जाते. XUV300 ला पाच-स्टार NCAP सुरक्षितता रेटिंग सुद्धा मिळाली आहे. या कार मध्ये ६ एअरबॅग, EBD सह ABS देखील देण्यात आला आहे. सोबतच चारही व्हील ला डिस्क ब्रेक, ISOFIX, सह-ड्रायव्हरसाठी सीट-बेल्ट रिमाइंडर, मागील डिफॉगर, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, फ्रंट सीट बेल्टसह, प्री-टेन्शनर आणि लोड-लिमिटर, इम्पॅक्ट सेन्सिंग डोअर अनलॉक, पॅनिक ब्रेकिंग सिग्नल, इमोबिलायझर आणि पॅसेंजर एअरबॅग डिएक्टिव्हेशन स्विच सारखे सेफ्टी फिचर्स मिळतात. महिंद्रा XUV300 मध्ये हिल होल्ड कंट्रोल देखील देण्यात आले आहे. 

महिंद्रा XUV300 इंजिन – Mahindra XUV300 Flex Fuel Engine

महिंद्रा XUV300 १.२ लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि १.५ लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन या दोन व्हेरियंटमध्ये भारतात विकली जाते. १.२ लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन १०९ BHP ची पॉवर आणि २०० NM चा टॉर्क प्रदान करते तर १.५ लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन ११५ BHP ची पॉवर आणि ३०० NM चा टॉर्क प्रदान करते. या दोन्ही व्हेरियंट मध्ये ४२ लिटरची इंधनाची टाकी देण्यात आली आहे.

महिंद्रा XUV300 डिसाईन – Mahindra XUV300 Flex Fuel Design

महिंद्रा XUV300 एक उत्तम लुक असलेली कार आहे. तिच्या आकर्षक डिसाईन मुळे ग्राहकांना नेहमीच या कार चे आकर्षण राहिले आहे. महिंद्रा XUV300 चे इंटीरियर देखील फिचर्स ने भेरलेलं बनवण्यात आले आहे. ७ इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आला आहे. हा इंफोटेनमेंट सिस्टम अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले ला सपोर्ट करणारा आहे.

महिंद्रा XUV300 च्या टॉप मॉडेल मध्ये सनरूफ देण्यात आले आहे. ORVMs (आरसा) इलेक्ट्रिकली चालू बंद करता येतो. मागील बाजूस डिफॉगर सुद्धा देण्यात आला आहे. हॅलोजन प्रोजेक्टर हेडलाइट्स या कार मध्ये देण्यात आले आहेत. पुढील बाजूस दिवसा चालणारे LED आणि मागील लाईट देखील LED दिली जाते. सोबतच १६ इंचाचे अलॉय व्हील्स देखील देण्यात आले आहेत.

Mahindra XUV300 Flex Fuel Mileage

महिंद्रा XUV300 माइलेज – Mahindra XUV300 Flex Fuel Mileage

महिंद्रा XUV300 चे १.२ लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल मॅन्युअल इंजिन १८.२४ kmpl च माइलेज देते. १.२ लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल ऑटोमॅटिक इंजिन १६.५ kmpl च माइलेज देते. १.५ लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल मॅन्युअल इंजिन २०.१ kmpl च माइलेज देते. १.५ लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल ऑटोमॅटिक इंजिन १९.७ kmpl च माइलेज देते. हे माइलेज प्रत्येकाच्या ड्रायविंग वर अवलंबून असणार आहे.

महिंद्रा XUV300 किंमत – Mahindra XUV300 Flex Fuel Price

महिंद्रा XUV300 चे १९ व्हेरियंट भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. महिंद्रा XUV300 च्या सर्व व्हेरियंटच्या किंमती पुढील प्रमाणे आहेत.

XUV300 W2 1.2 Petrol₹ ९.३९ लाख
XUV300 W4 1.2 Petrol₹ १०.२० लाख
XUV300 W6 1.2 Petrol₹ ११.७३ लाख
XUV300 W4 1.5 Diesel₹ १२.३९ लाख
XUV300 W6 1.2 Petrol AMT₹ १२.७६ लाख
XUV300 W6 1.5 Diesel₹ १३.३३ लाख
XUV300 W8 1.2 Petrol₹ १३.६९ लाख
XUV300 W8 1.2 Petrol Dual Tone₹ १३.८७ लाख
XUV300 W6 1.5 Diesel AMT₹ १४.८८ लाख
XUV300 W8 (O) 1.2 Petrol₹ १४.९८ लाख
XUV300 W8(O) 1.2 Petrol Dual Tone₹ १५.१६ लाख
XUV300 W8 1.5 Diesel₹ १५.७१ लाख
XUV300 W8 (O) 1.2 Petrol AMT₹ १५.८० लाख
XUV300 W8 1.5 Diesel Dual Tone₹ १५.८९ लाख
XUV300 W8 (O) 1.2 Petrol AMT Dual Tone₹ १५.९७ लाख
XUV300 W8 (O) 1.5 Diesel₹ १६.८१ लाख
XUV300 W8(O) 1.5 Diesel Dual Tone₹ १६.९९ लाख
XUV300 W8 (O) 1.5 Diesel AMT₹ १७.६२ लाख
XUV300 W8 (O) 1.5 Diesel AMT Dual Tone₹ १७.७९ लाख

वरील किंमती या ऑन रोड मुंबईच्या असून तुमच्या शहराप्रमाणे या कार च्या ऑन रोड किंमती मध्ये बदल होणार आहे.

या कार बद्दल नवीन माहिती मिळाली कि वेळोवेळी या आर्टिकल मध्ये बदल केले जातील. जर तुम्हांला Mahindra XUV300 बद्दल अजून माहिती हवी असेल तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ती मिळवू शकता.

FAQ:

महिंद्रा XUV300 फिचर्स? Mahindra XUV300 Features?

महिंद्रा XUV300 मध्ये तब्बल १९ व्हेरियंट येतात. या व्यतिरिक्त EV मध्ये देखील हि कार येते जी XUV400 म्हणून भारतात विकली जाते. XUV300 ला पाच-स्टार NCAP सुरक्षितता रेटिंग सुद्धा मिळाली आहे. या कार मध्ये ६ एअरबॅग, EBD सह ABS देखील देण्यात आला आहे. सोबतच चारही व्हील ला डिस्क ब्रेक, ISOFIX, सह-ड्रायव्हरसाठी सीट-बेल्ट रिमाइंडर, मागील डिफॉगर, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, फ्रंट सीट बेल्टसह, प्री-टेन्शनर आणि लोड-लिमिटर, इम्पॅक्ट सेन्सिंग डोअर अनलॉक, पॅनिक ब्रेकिंग सिग्नल, इमोबिलायझर आणि पॅसेंजर एअरबॅग डिएक्टिव्हेशन स्विच सारखे सेफ्टी फिचर्स मिळतात. महिंद्रा XUV300 मध्ये हिल होल्ड कंट्रोल देखील देण्यात आले आहे. 

महिंद्रा XUV300 माइलेज? Mahindra XUV300 Mileage?

महिंद्रा XUV300 चे १.२ लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल मॅन्युअल इंजिन १८.२४ kmpl च माइलेज देते. १.२ लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल ऑटोमॅटिक इंजिन १६.५ kmpl च माइलेज देते. १.५ लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल मॅन्युअल इंजिन २०.१ kmpl च माइलेज देते. १.५ लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल ऑटोमॅटिक इंजिन १९.७ kmpl च माइलेज देते. हे माइलेज प्रत्येकाच्या ड्रायविंग वर अवलंबून असणार आहे.

महिंद्रा XUV300 किंमत? Mahindra XUV300 Price?

महिंद्रा XUV300 ची किंमत ऑन रोड मुंबई ९.३९ लाखांपासून सुरु होते आणि टॉप मॉडेल १७.७९ लाखांपर्यंत आहे.

हे वाचा: New Ford Endeavour: फोर्ड एंडेव्हर भारतात पुन्हा विक्रीसाठी सज्ज?

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment