Renault Kiger 2024: रेनॉ कायगरने भारतीय बाजारपेठेत धूमधडाका घातला आहे. नवीन डिजाईन, शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट सोईच्या वैशिष्ट्यांसह, ही कार नेहमीच चर्चेत राहिली आहे.
Table of Contents
रेनॉ कायगरचे डिजाईन आकर्षक आहे. या कारची बूटस्पेस आणि ग्राउंड क्लीयरन्स खूप चांगला आहे. समोरच्या बाजूस नवीन एलईडी हेडलाईट्स आणि फॉग लाईट्स आकर्षण वाढवतात. यामुळे रात्रीच्या वेळी गाडी चालवणे सोपे होते. कारच्या बाजूने सुरेख आणि आकर्षक रेखाटन आहे, जे लोकांच्या नजरेत चटकन भरते.
रेनॉ कायगर फिचर्स – Renault Kiger Features
रेनॉ कायगर मध्ये तब्बल २१ व्हेरियंट येतात. रेनॉ कायगर ला ४ स्टार NCAP सुरक्षितता रेटिंग मिळाली आहे. या कार मध्ये ४ एअरबॅग, एबीएस, ईबीडी, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि कॅमेरा आहेत. हे वैशिष्ट्ये ड्रायव्हिंगच्या वेळेस सुरक्षा प्रदान करतात. रेनॉ कायगरचे अंतर्गत सजावट साधारण पण आकर्षक आहे. डॅशबोर्डवर ८-इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टम आहे, ज्यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्ट आहे. यात ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूज कंट्रोल, आणि स्टिअरिंगवर माउंटेड कंट्रोल्स देखील आहेत.
सीट्समध्ये चांगला लेदर फिनिश आहे, जो प्रवासाला अधिक आरामदायी बनवतो. मागील सीट्सवर पर्यायाने एसी वेंट्स आणि आर्मरेस्ट आहेत. बूटस्पेस ४०५ लीटर आहे, जो लांब प्रवासासाठी उपयुक्त आहे.
रेनॉ कायगर इंजिन – Renault Kiger Engine
रेनॉ कायगरमध्ये दोन प्रकारची इंजिन्स उपलब्ध आहेत – १.० लीटर टर्बो पेट्रोल आणि १.० लीटर नैसर्गिक पेट्रोल. टर्बो पेट्रोल इंजिन १०० बीएचपी आणि १६० एनएम टॉर्क देते. नैसर्गिक पेट्रोल इंजिन ७२ बीएचपी आणि ९६ एनएम टॉर्क देते. दोन्ही इंजिन्स हे ५-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहेत.
रेनॉ कायगर माइलेज – Renault Kiger Mileage
रेनॉ कायगरचे मायलेज देखील चांगले आहे. टर्बो पेट्रोल इंजिन १८.२४ किलोमीटर प्रति लीटरचा मायलेज देते. नैसर्गिक पेट्रोल इंजिन २०.५३ किलोमीटर प्रति लीटरचा मायलेज देते. हे मायलेज शहरात आणि महामार्गावर ड्रायव्हिंग करण्यासाठी चांगले आहे. हे माइलेज प्रत्येकाच्या ड्रायविंग वर अवलंबून असणार आहे.
रेनॉ कायगर किंमत – Renault Kiger Price
रेनॉ कायगर चे २१ व्हेरियंट भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रेनॉ कायगर च्या सर्व व्हेरियंटच्या किंमती पुढील प्रमाणे आहेत.
RXE | ₹ ७.०४ लाख |
RXL | ₹ ७.७३ लाख |
RXL AMT | ₹ ८.३१ लाख |
RXT MT | ₹ ८.७७ लाख |
RXT(O) MT | ₹ ९.३४ लाख |
RXT AMT | ₹ ९.३४ लाख |
RXT(O) MT Dual Tone | ₹ ९.६१ लाख |
RXT(O) AMT | ₹ ९.९२ लाख |
RXT(O) AMT Dual Tone | ₹ १०.१८ लाख |
RXZ MT | ₹ १०.२६ लाख |
RXZ MT Dual Tone | ₹ १०.५३ लाख |
RXZ AMT | ₹ १०.८४ लाख |
RXT(O) Turbo MT | ₹ १०.८४ लाख |
RXT(O) Turbo MT Dual Tone | ₹ ११.१० लाख |
RXZ AMT Dual Tone | ₹ ११.१० लाख |
RXZ Turbo MT | ₹ ११.६४ लाख |
RXZ Turbo MT Dual Tone | ₹ १२.११ लाख |
RXT (O) Turbo CVT | ₹ १२.२० लाख |
RXT (O) Turbo CVT Dual Tone | ₹ १२.४७ लाख |
RXZ Turbo CVT | ₹ १३.०२ लाख |
RXZ Turbo CVT Dual Tone | ₹ १३.२८ लाख |
वरील किंमती या ऑन रोड मुंबईच्या असून तुमच्या शहराप्रमाणे या कार च्या ऑन रोड किंमती मध्ये बदल होणार आहे.
रेनॉ कायगर चा प्रति महिना हप्ता – Renault Kiger EMI
रेनॉ कायगर च्या बेस मॉडेलची (Kiger RXE) एक्स शोरूम किंमत ५,९९,९९०/- असून, RTO शुल्क ७१,२६६/-, विमा ३१,११६/- आणि इतर शुल्क २,०००/- मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत ७,०४,३७२/- होते. रेनॉ कायगर बेस मॉडेल EMI वर घेण्यासाठी १,६४,३८१/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ५ वर्षांसाठी ५,३९,९९१/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला ११,४७३/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ५ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.
रेनॉ कायगर च्या टॉप मॉडेलची (RXZ Turbo CVT Dual Tone) एक्स शोरूम किंमत ११,२२,९९०/- असून, RTO शुल्क १,४२,८०४/-, विमा ४९,४४९/- आणि इतर शुल्क १३,२२९/- मिळून ऑन रोड मुंबई ची किंमत १३,२८,४७२/- होते. रेनॉ कायगर टॉप मॉडेल EMI वर घेण्यासाठी ३,१७,७८१/- चं डाउन पेमेंट भरावे लागेल त्यानंतर १० टक्के व्याजदराने ५ वर्षांसाठी १०,१०,६९१/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. ज्यामध्ये तुम्हांला २१,४७४/- रुपयांचा प्रति महिना हप्ता ५ वर्षांसाठी भरावा लागणार आहे.
या मध्ये आम्ही फक्त बेस आणि टॉप मॉडेल च्या EMI ची माहिती दिली आहे, इतर मॉडेल च्या माहिती साठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला किंवा शोरूम ला भेट द्या.
या कार बद्दल नवीन माहिती मिळाली कि वेळोवेळी या आर्टिकल मध्ये बदल केले जातील. जर तुम्हांला Renault Kiger 2024 बद्दल अजून माहिती हवी असेल तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ती मिळवू शकता.
FAQ:
रेनॉ कायगर चे वैशिष्ट्य? Renault Kiger Specifications?
रेनॉ कायगर मध्ये तब्बल २१ व्हेरियंट येतात. रेनॉ कायगर ला ४ स्टार NCAP सुरक्षितता रेटिंग मिळाली आहे. या कार मध्ये ४ एअरबॅग, एबीएस, ईबीडी, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि कॅमेरा आहेत. डॅशबोर्डवर ८-इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टम आहे, ज्यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्ट आहे. यात ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूज कंट्रोल, आणि स्टिअरिंगवर माउंटेड कंट्रोल्स देखील आहेत. रेनॉ कायगरमध्ये दोन प्रकारची इंजिन्स उपलब्ध आहेत – १.० लीटर टर्बो पेट्रोल आणि १.० लीटर नैसर्गिक पेट्रोल.
रेनॉ कायगर चे मायलेज? Renault Kiger Mileage?
रेनॉ कायगरचे मायलेज देखील चांगले आहे. टर्बो पेट्रोल इंजिन १८.२४ किलोमीटर प्रति लीटरचा मायलेज देते. नैसर्गिक पेट्रोल इंजिन २०.५३ किलोमीटर प्रति लीटरचा मायलेज देते. हे मायलेज शहरात आणि महामार्गावर ड्रायव्हिंग करण्यासाठी चांगले आहे. हे माइलेज प्रत्येकाच्या ड्रायविंग वर अवलंबून असणार आहे.