Animal Movie Controversy : “अॅनिमल (Animal)” चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. कबीर सिंग, अर्जुन रेड्डी यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या संदीप रेड्डी वंगा याने हा अॅनिमल चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सध्या हा चित्रपट एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. अॅनिमल हा चित्रपट एका चित्रपटाची कॉपी आहे असे काही लोक बोलत आहेत.
Table of Contents
अॅनिमल चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) अभिनयाचे आणि लूकचे त्याच्या चाहत्यांमध्ये कौतुक होताना दिसत आहे. चित्रपटात बराच काळ ब्रेक घेत बॉबी देओलने (Bobby Deol) देखील या अॅनिमल चित्रपटातुन त्याचे कम बॅक केले आहे. रणबीर कपूर सोबतच बॉबी देओल च्या अभिनयाचे कौतुक होत आहे. सध्या हा चित्रपट एका वेगळ्याच कारणाने वादात सापडला आहे.
Animal Movie Controversy – दुसऱ्या एका चित्रपटातील सीन कॉपी करण्यात आल्याचा आरोप
संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित “अॅनिमल (Animal)” चित्रपटावर दुसऱ्या एका चित्रपटातील सीन कॉपी करण्यात आल्याचा आरोप होत आहे. “अॅनिमल” चित्रपटात काही सीन हे हॉलिवूड चित्रपट “ओल्ड बॉय” या चित्रपटातील असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे एका बाजूने या चित्रपटाला सोशल मीडिया वर ट्रोल केले जात आहे. अॅनिमल चित्रपटातील चित्रित केलेले काही फाईट सीन्स, अॅक्शन सीन, छायांकन या सर्व गोष्टी हॉलिवूड चित्रपट “ओल्ड बॉय” या चित्रपटातील असल्यामुळे नेटकऱ्यांनी रणबीर कपूरच्या या आगामी चित्रपटाला चांगलेच धारेवर धरले आहे. परंतु असे काही पहिल्यांदा झालेलं नाही या आधी देखील बऱ्याच चित्रपटात कुठल्याना कुठल्या चित्रपटाची सीन ची कॉपी करण्यात आली आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी हॉलिवूडच्या चित्रपटातील दृश्यांची कॉपी करून प्रेक्षकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला आहे असे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या बॉलिवूडमध्ये दक्षिण भारतीय चित्रपटांचा रिमेक करण्याची ट्रेंड चालू आहे. बॉलिवूडच्या दिग्दर्शकांना स्वतःची अशी शैली राहिली नाही आहे का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.
Animal Movie Release Date Announced – “अॅनिमल” चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरु
“अॅनिमल (Animal)” हा चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना अशी तंगडी स्टार कास्ट आहे. अनिल कपूर (Anil Kapoor) या चित्रपटात रणबीर कपूर च्या वडिलांची भूमिकेत तर रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) रणबीर कपूर च्या बायकोच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी या चित्रपटातून वडिल आणि मुलाची एक वेगळी कहाणी प्रेक्षकांसमोर मांडली आहे. संदीप रेड्डी वंगा यांनी या आधी दिग्दर्शित केलेले कबीर सिंग आणि अर्जुन रेड्डी सारखे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले होते. “अॅनिमल” या चित्रपटाला प्रेक्षक कशी दाद देतात हे पाहावे लागेल.
जरी हा चित्रपट वादाच्या कचाट्यात सापडला असला तरी या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये खूप आहे. आणि याचाच प्रत्यय “अॅनिमल (Animal)” चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरु झाल्या झाल्या आला आहे. याचे कारण म्हणजे या चित्रपटाची ३.४ कोटी रुपयांची तिकिटे बुक झाली आहेत. १ डिसेंबरलाच विकी कौशलचा चित्रपट “सॅम बहादूर (Sam Bahadur)” प्रदर्शित होणार आहे. परंतु “सॅम बहादूर” पेक्षा “अॅनिमल” या चित्रपटाला लोकांनी जास्त पसंती दाखवली आहे. “अॅनिमल” ची बॉक्स ऑफिसवर किती कामे होते हे आपल्याला काहीच दिवसात स्पष्ट होईल.
FAQ:
अॅनिमल (Animal) चित्रपट प्रदर्शन तारीख? Animal Movie Release Date?
“अॅनिमल (Animal)” हा चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना अशी तंगडी स्टार कास्ट आहे. अनिल कपूर (Anil Kapoor) या चित्रपटात रणबीर कपूर च्या वडिलांची भूमिकेत तर रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) रणबीर कपूर च्या बायकोच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
अॅनिमल चित्रपट विवाद काय आहे? Animal Movie Controversy?
अॅनिमल चित्रपटातील चित्रित केलेले काही फाईट सीन्स, अॅक्शन सीन, छायांकन या सर्व गोष्टी हॉलिवूड चित्रपट “ओल्ड बॉय” या चित्रपटातील असल्यामुळे नेटकऱ्यांनी रणबीर कपूरच्या या आगामी चित्रपटाला चांगलेच धारेवर धरले आहे. परंतु असे काही पहिल्यांदा झालेलं नाही या आधी देखील बऱ्याच चित्रपटात कुठल्याना कुठल्या चित्रपटाची सीन ची कॉपी करण्यात आली आहे.
अॅनिमल चित्रपट कलाकार? Animal movie cast?
अॅनिमल (Animal) चित्रपटामध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor), बॉबी देओल (Bobby Deol), अनिल कपूर (Anil Kapoor), रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) अशी तंगडी स्टार कास्ट आहे.