Redmi Note 13 Pro Plus 5G – २०० मेगापिक्सेलचा स्मार्टफोन, किंमत???

Redmi Note 13 Pro Plus 5G Price in India

Redmi Note 13 Pro Plus 5G हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. रेडमीचा हा स्मार्टफोन चीन मध्ये या आधीच लॉन्च करण्यात आला होता.

Redmi च्या स्मार्टफोन ना भारतीय बाजारात नेहमीच पसंती दिली जाते. भारतात Redmi चे युजर्स बऱ्याच प्रमाणात आहेत त्यामुळे ह्या येणाऱ्या नवीन स्मार्टफोन ची उत्सुकता ग्राहकांना लागली आहे.

रेडमी नोट 13 प्रो प्लस 5G डिस्प्ले – Redmi Note 13 Pro Plus 5G Display

Redmi Note 13 Pro Plus 5G चा डिस्प्ले ६.६७ इंचाचा असणार आहे. स्क्रीनला गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन दिले गेले आहे. १२० Hz रिफ्रेश रेट सह 3D Curved AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. १२२० x २७१२ चे रिझोल्यूशन या फोन मध्ये मिळणार आहे. या स्मार्टफोन चा डिस्प्ले बेझल लेस असेल.

रेडमी नोट 13 प्रो प्लस 5G कॅमेरा – Redmi Note 13 Pro Plus 5G Camera

ज्या ग्राहकांना चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन हवा असेल अश्या ग्राहकांना हा स्मार्टफोन नक्कीच आवडेल. कारण Redmi कंपनी या Redmi Note 13 Pro Plus 5G मध्ये २०० मेगापिक्सेल चा वाइड अँगल प्राथमिक कॅमेरा दिला आहे त्या सोबतच ८ मेगापिक्सेल चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल चा मॅक्रो कॅमेरा दिला आहे. अंधारात देखील फोटो चांगले येण्यासाठी ड्युअल कलर एलईडी फ्लॅशलाइट देण्यात आला आहे.

२०० मेगापिक्सेल चा वाइड अँगल प्राथमिक कॅमेराला 4K @24fps चा व्हिडिओ रेकॉर्ड ची क्षमता देण्यात आली आहे. या स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा १६ मेगापिक्सेलचा असून सेल्फी कॅमेरामध्ये वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी कॅमेर्‍याने सुद्धा @30 fps ने फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्ड तुम्हांला करता येणार आहे.

Redmi Note 13 Pro Plus 5G Camera

रेडमी नोट 13 प्रो प्लस 5G प्रोसेसर- Redmi Note 13 Pro Plus 5G Processor

Redmi Note 13 Pro Plus 5G मध्ये MediaTek Dimensity 7200 Ultra 5G प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा प्रोसेसर अतिशय शक्तिशाली प्रोसेसर मानला जातो. या प्रोसेसर मुळे गेमिंग खेळणाऱ्या ग्राहकांना फायदा मिळणार आहे. गेमिंगच्या वेळी स्मार्टफोन हँग होणे किंवा गरम होणे अश्या समस्या या स्मार्टफोन होणार नाही. हा फोन 5G असल्यामुळे हाय स्पीड 5G नेटवर्कचा वापर तुम्हांला करता येणार आहे.

रेडमी नोट 13 प्रो प्लस 5G बॅटरी आणि चार्जर – Redmi Note 13 Pro Plus 5G Battery & Charger

Redmi Note 13 Pro Plus 5G या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची तंगडी बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हांला फोन सारखा सारखा चार्ज करावा लागणार नाही. Redmi च्या या फोन मध्ये इतर फोन प्रमाणेच USB Type-C पोर्ट मिळणार आहे. १२०W चा फास्ट चार्जर या मध्ये देण्यात आला आहे. USB Type-C आणि १२०W चा फास्ट चार्जर यामुळे ० ते १०० टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी फक्त १९ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. नॉर्मल वापर केल्यास १२ ते १३ तास तुम्हांला हा फोन चार्ज करण्याची गरज लागणार नाही.

Is redmi Note 13 Pro Plus 5G waterproof

रेडमी नोट १३ प्रो प्लस 5G ला IP68 रेटिंग देण्यात आली आहे म्हणजेच हा स्मार्टफोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित असणार आहे.

रेडमी नोट 13 प्रो प्लस 5G ची भारतात किंमत – Redmi Note 13 Pro Plus 5G Price in India

Redmi Note 13 Pro Plus 5G तीन मॉडेल मध्ये भारतीय बाजारात आला आहे. ८GB रॅम + २५६GB मेमरी, १२GB रॅम + २५६GB मेमरी आणि १२GB रॅम + ५१२GB मेमरी असे तीन मॉडेल असणार आहेत. ८GB रॅम + २५६GB मेमरी ची किंमत ३१,९९९/- रुपये, १२GB रॅम + २५६GB मेमरी ची किंमत ३३,९९९/- आणि १२GB रॅम + ५१२GB मेमरी ची किंमत ३५,९९९/- असणार आहे.

तुम्ही जर Xiaomi किंवा Redmi यूजर्स असाल तर हा स्मार्टफोन तुमचे अजून पैसे वाचवणार आहे कारण कंपनी ने Xiaomi किंवा Redmi यूजर्सना कंपनीसोबत एकनिष्ठ राहिल्याबद्दल डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुमच्या कडे ICICI बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असेल तर तुम्हांला २०००/- रुपयांपर्यंत ची सूट मिळू शकेल.

Redmi Note 13 Pro Plus 5G भारतात लॉन्च होण्याची तारीख – Redmi Note 13 Pro Plus 5G Launch Date in India

Redmi Note 13 Pro Plus 5G चे आज ४ जानेवारी २०२४ लॉन्च करण्यात आला आहे. १० जानेवारी २०२४ पासून ग्राहकांना हा नवीन स्मार्टफोन Redmi च्या अधिकृत वेबसाईटवर विक्री साठी उपलब्ध असणार आहे.

FAQ:

रेडमी नोट १३ प्रो प्लस 5G प्रोसेसर?- Redmi Note 13 Pro Plus 5G Processor?

Redmi Note 13 Pro Plus 5G मध्ये MediaTek Dimensity 7200 Ultra 5G प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा प्रोसेसर अतिशय शक्तिशाली प्रोसेसर मानला जातो. या प्रोसेसर मुळे गेमिंग खेळणाऱ्या ग्राहकांना फायदा मिळणार आहे.

रेडमी नोट १३ प्रो प्लस 5G ची किंमत? – Redmi Note 13 Pro Plus 5G Price in India?

Redmi Note 13 Pro Plus 5G तीन मॉडेल मध्ये भारतीय बाजारात आला आहे. ८GB रॅम + २५६GB मेमरी, १२GB रॅम + २५६GB मेमरी आणि १२GB रॅम + ५१२GB मेमरी असे तीन मॉडेल असणार आहेत. ८GB रॅम + २५६GB मेमरी ची किंमत २९,०००/- रुपये, १२GB रॅम + २५६GB मेमरी ची किंमत ३१,९९९/- आणि १२GB रॅम + ५१२GB मेमरी ची किंमत ३३,९९९/- असणार आहे. तुम्ही जर Xiaomi किंवा Redmi यूजर्स असाल तर हा स्मार्टफोन तुमचे अजून पैसे वाचवणार आहे कारण कंपनी ने Xiaomi किंवा Redmi यूजर्सना कंपनीसोबत एकनिष्ठ राहिल्याबद्दल डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुमच्या कडे ICICI बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असेल तर तुम्हांला २०००/- रुपयांपर्यंत ची सूट मिळू शकेल.

रेडमी नोट १३ प्रो प्लस 5G वॉटरप्रूफ आहे का? Is redmi Note 13 Pro Plus 5G waterproof?

रेडमी नोट १३ प्रो प्लस 5G ला IP68 रेटिंग देण्यात आली आहे म्हणजेच हा स्मार्टफोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित असणार आहे.

हे वाचा: Redmi 13C 5G: नवीन स्वस्त 5G स्मार्टफोन!

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment