Tesla Cybertruck: ‘बुलेटप्रूफ’ ईव्ही ट्रक ज्याची रेंज आहे ५४७ किमी

Tesla Cybertruck range

Tesla Cybertruck: चार वर्षांपूर्वी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी टेस्ला सायबर ट्रकची घोषणा केली होती आणि त्या नंतर बुकिंगला देखील सुरवात झाली होती. परंतु आता या बहुप्रतीक्षित सायबर ट्रकची प्रतीक्षा संपली आहे. एलोन मस्क यांनी अधिकृतपणे इलेक्ट्रिक पिकअप सायबर ट्रकची किंमत जाहीर केली आहे.

अमेरिकेतील टेक्सास मध्ये एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला जिथे एलोन मस्क (Elon Musk) यांनी त्यांच्या ग्राहकांना हे सायबर ट्रक वितरित केले. एलोन मस्क यांनी ग्राहकांना वितरित केलेला एक ट्रक स्वतः चालवा. 

हे सर्व असले तरी काही लोकांच्या मते ह्या सायबर ट्रकची किंमत जास्त असल्याचे सांगितले जात आहे. चार वर्षांपूर्वी २०१९ मध्ये जेव्हा सायबरट्रकची (Tesla Cybertruck) घोषणा करण्यात आली तेव्हा टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी जी किंमत सांगितली होती त्याच्या जवळजवळ ५० टक्के जास्त किंमत आता या सायबरट्रकची सांगण्यात येत आहे. हा सायबर ट्रक बुक केलेल्या जवळपास २० लाख ग्राहकांना अंदाजे ५०.८२ लाख रुपये म्हणजेच $६१,००० अमेरिकन डॉलर्स एवढे जातीचे पैसे मोजावे लागणार आहेत. एलोन मस्क यांनी चार वर्षांपूर्वी २०१९ मध्ये ह्या ट्रकची किंमत अंदाजे $४०,००० असेल असे सांगितले होते. परंतु आता ह्या सायबरट्रकची किंमत ८३.३० लाख म्हणजेच $१००,००० अमेरिकन डॉलर्स एवढी ठेवण्यात आली आहे. 

सायबर ट्रक (Tesla Cybertruck) बुक करण्याची बुकिंगची रक्कम सुरवातीला $१०० अमेरिकन डॉलर्स होती त्या मध्ये देखील आता वाढ करण्यात आली आहे. आता ज्या ग्राहकांना सायबर ट्रक बुक करायचा असेल त्यांना अंदाजे २१,००० रुपये म्हणजेच $२५० अमेरिकन डॉलर्स मोजावे लागणार आहेत. एलोन मस्क यांनी दिलेल्या माहिती नुसार सध्या १ दशलक्षाहून अधिक प्री-ऑर्डर सायबर ट्रकसाठी आलेल्या आहेत. टेस्लाच्या सायबर ट्रकची स्पर्धा हमर च्या हमर ईव्ही (Hummer EV), फोर्ड च्या एफ १५० लायटनींग (Ford F150 Lightning) आणि रिव्हियन आर १टी (Rivian R1T) सोबत असणार आहे. 

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी अमेरिकेतील टेक्सास मध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये सायबरट्रक बद्दलची सर्व माहिती उघड केली आहे. टेस्लाच्या या नवीन सायबर ट्रक (Tesla Cybertruck) मध्ये काय काय सुविधा देण्यात आल्या आहेत याचा तपशील जाणून घेऊया. 

Tesla Cybertruck Bulletproof

What is the range of a Cybertruck? – टेस्लाचे मॉडेल आणि त्यांची रेंज

टेस्लाचा सायबर ट्रकमध्ये (Tesla Cybertruck) ३ मॉडेल असणार आहेत. सुरुवातीच्या एंट्री-लेव्हल मॉडेल मध्ये “रीअर व्हील ड्राइव्ह” मॉडेल असणार आहे. दुसरे मॉडेल मिड-स्पेक असणार आहे ज्यामध्ये “ऑल-व्हील ड्राइव्ह” मॉडेल असणार आहे. तिसरे मॉडेल सायबरबीस्ट हे सर्वात महाग $१००,००० अमेरिकन डॉलर्स ला असणार आहे. एंट्री-लेव्हल मॉडेल साठी लोकांना अजून वर्षभर वाट बघावी लागणार आहे असे टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी सांगितले. 

टेस्लाचे तीनही मॉडेल वेगवेगळ्या रेंज (Tesla Cybertruck range)  प्रदान करतील. एंट्री-लेव्हल रिअर-व्हील ड्राइव्ह सायबरट्रक एका चार्जमध्ये सुमारे ४०२ किलोमीटरचे अंतर पार करेल. ० ते १०० किमी चा वेग गाठण्यासाठी ह्या ट्रक ला ७ सेकंदांपेक्षा कमी वेळ लागणार आहे. मिड-स्पेक ऑल-व्हील ड्राइव्ह मॉडेल एका चार्जमध्ये सुमारे ५४७ किलोमीटरचे अंतर पार करेल. ० ते १०० किमी चा वेग गाठण्यासाठी ह्या ट्रक ला ४ सेकंदाचा वेळ लागणार आहे. सायबरबीस्ट मॉडेल एका चार्जमध्ये सुमारे ५१५ किलोमीटरचे अंतर पार करेल. ० ते १०० किमी चा वेग गाठण्यासाठी ह्या ट्रक ला ३ सेकंदांपेक्षा कमी वेळ लागणार आहे.

Tesla Cybertruck Bulletproof: ‘बुलेटप्रूफ’ ईव्ही ट्रक

टेस्लाच्या सायबरट्रकमध्ये (Tesla Cybertruck) रेंज आणि पॉवर व्यतिरिक्त अजून एक वेगळी गोष्ट आहे आणि ती म्हणजे टेस्लाचा हा सायबरट्रक बुलेटप्रूफ आहे. सायबर ट्रक वितरण कार्यक्रमाच्या वेळी एक व्हिडिओ शेअर केला गेला ज्या मध्ये सायबर ट्रकवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत ज्या ट्रकच्या स्टेनलेस स्टीलच्या बॉडीमध्ये घुसण्यात अयशस्वी ठरल्या आहेत. 

भारतामध्ये टेस्लाची वाट बरेच चाहते बघत आहेत. आता पाहावे लागेल टेस्लाची एंट्री भारतीय बाजारात कधी होते.

FAQ:

टेस्लाचा सायबर ट्रक ची रेंज किती आहे? What is the range of a Cybertruck?

टेस्लाचे तीनही मॉडेल वेगवेगळ्या रेंज (Tesla Cybertruck range)  प्रदान करतील. एंट्री-लेव्हल रिअर-व्हील ड्राइव्ह सायबरट्रक एका चार्जमध्ये सुमारे ४०२ किलोमीटरचे अंतर पार करेल. मिड-स्पेक ऑल-व्हील ड्राइव्ह मॉडेल एका चार्जमध्ये सुमारे ५४७ किलोमीटरचे अंतर पार करेल. सायबरबीस्ट मॉडेल एका चार्जमध्ये सुमारे ५१५ किलोमीटरचे अंतर पार करेल.

सायबर ट्रक ० ते १०० किमी चा वेग गाठण्यासाठी किती वेळ घेणार? What is the time of the Tesla Cybertruck 0 to 100?

एंट्री-लेव्हल रिअर-व्हील ड्राइव्ह सायबरट्रकला ० ते १०० किमी चा वेग गाठण्यासाठी ७ सेकंदांपेक्षा कमी वेळ लागणार आहे. मिड-स्पेक ऑल-व्हील ड्राइव्ह मॉडेलला ० ते १०० किमी चा वेग गाठण्यासाठी ४ सेकंदाचा वेळ लागणार आहे. सायबरबीस्ट मॉडेलला ० ते १०० किमी चा वेग गाठण्यासाठी ३ सेकंदांपेक्षा कमी वेळ लागणार आहे.

हे वाचा: Toyota Hilux Champ: टोयोटाचा नवा स्वस्त पिकअप, टोयोटा फॉर्च्युनर होणार स्वस्त?

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment