BharatGPT: आजच्या युगात टेक्नोलाॅजी एवढी विकसित झाली आहे कि वेगवेगळी कामे AI च्या मदतीने सोप्पी होऊ लागली आहेत. AI एवढं प्रगत झाले आहे कि एका क्लिक मध्ये कठीण वाटणारी कामे पूर्ण होऊ लागली.
Table of Contents
सध्या गुगल वर जर तुम्ही AI टूल सर्च कराल तर विविध प्रकारचे AI टूल तुम्हांला दिसतील. प्रत्येक टूल काही ना काही स्वतःच वेगळे पण घेऊन आले आहेत. ChatGPT हे त्यामधलेच एक प्रचलित टूल आहे. ह्या टूल चा वापर विविध क्षेत्रातील लोकांना त्यांची कामे झटक्यात पूर्ण करायला मदत होते. ChatGPT टूल ला विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर काही सेकंदात तुम्हांला मिळते. आज विविध क्षेत्रातील लोकांचा ChatGPT हा अविभाज्य घटक झाला आहे.
ChatGPT कोणी तयार केले? Who created ChatGPT?
OpenAI या AI संशोधन कंपनीने ChatGPT या टूल ची निर्मिती केली आहे. OpenAI चे सीईओ आणि सह-संस्थापक सॅम ऑल्टमन (Sam Altman) हे आहेत.
भारतामध्ये ChatGPT चा वापर करणारे असंख्य लोक आहेत. कामामध्ये येणाऱ्या अडचणीचं सोल्युशन म्हणून लोक ChatGPT चा वापर करत असतात. कामामध्ये एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल तर लोक ChatGPT ला प्रश्न विचारून त्याची माहिती मिळवतात. बऱ्याच लोकांना इंग्लिश मध्ये लिहिण्याचा प्रॉब्लेम असतो असे लोक ChatGPT चा वापर करून ई-मेल किंवा एखादी माहिती सुलभ पद्धतीने ChatGPT कडून लिहून घेतात. अनेक विद्यार्थी ChatGPT चा वापर त्यांच्या शैक्षणिक अभ्यासासाठी करत आहेत. विविध क्षेत्रातील कॉन्टेन्ट रायटर ChatGPT चा वापर त्यांचे लेखन पूर्ण करण्यासाठी करत असतात.
हे सगळे असले तरी ChatGPT मध्ये भाषेचं लिमिट आहे. भारतामधील सर्व भाषा ChatGPT मध्ये उपलब्ध नाही आहेत. हीच त्रुटी मुकेश अंबानी यांच्या जिओ ने हेरली आहे आणि आता ते AI च्या जगात पाऊल ठेवणार आहेत. जिओ लवकरच BharatGPT नावाने AI टूल लॉन्च करणार आहे.
भारतजीपीटी म्हणजे काय? What is BharatGPT?
रिलायन्स जिओ कंपनीचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी वार्षिक टेकफेस्टमध्ये भारतजीपीटी ची घोषणा केली आहे. टेकफेस्टमध्ये बोलताना आकाश अंबानी यांनी BharatGPT बद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. BharatGPT हे AI टूल विविध भाषेमध्ये उपलब्ध असणार आहे.
भारतजीपीटी ला तुम्ही कोणत्याही भाषेत कोणताही प्रश्न विचारू शकता. सोबतच कोडींगचं काम, एखाद्या गोष्टीचे लेखन किंवा गणिताच्या समस्या अश्या आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही भारतजीपीटी च्या मदतीने करू शकणार आहात. BharatGPT वर सध्या रिलायन्स जिओ मध्ये काम सुरु आहे. लवकरच हे AI टूल लोकांच्या वापरात येईल.
BharatGPT हे AI टूल तयार करण्यासाठी आयआयटी बॉम्बे देखील रिलायन्स जिओ सोबत काम करत असल्याची माहिती रिलायन्स जिओचे चेअरपर्सन आकाश अंबानी यांनी दिली आहे. २०१४ पासून भारतजीपीटी वर काम चालू झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील प्रत्येक कंपनीला त्यांच्या व्यवसायासाठी भारतजीपीटी हे टूल वापरता यावे असा रिलायन्स जिओचा मानस आहे.
भविष्यात रिलायन्स जिओच्या प्रत्येक उत्पादनामध्ये AI वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा विचार आहे. भारतजीपीटी हा ChatGPT ला उत्तम पर्याय आहे कि नाही हे येणार काळच ठरवेल. सध्या तरी प्रतीक्षा असेल ती भारतजीपीटी च्या लॉन्च ची.
BharatGPT लाँच तारीख? BharatGPT Launch Date?
भारतजीपीटी हे AI टूल इंटरनेटवर कधी येणार हे अद्याप तरी रिलायन्स जिओने जाहीर केले नसले तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२४ च्या शेवटच्या टप्प्यात किंवा २०२५ च्या सुरुवातीला रिलायन्स जिओ भारतजीपीटी ला लॉन्च करू शकते. BharatGPT मध्ये असणाऱ्या अनेक नवीन वैशिष्ट्यांमुळे ChatGPT चे भविष्य धोक्यात येते का हे पाहावे लागेल.
FAQ:
ChatGPT कोणी तयार केले? Who created ChatGPT?
OpenAI या AI संशोधन कंपनीने ChatGPT या टूल ची निर्मिती केली आहे. OpenAI चे सीईओ आणि सह-संस्थापक सॅम ऑल्टमन हे आहेत.
BharatGPT हे AI टूल कोण बनवत आहे? Who created BharatGPT AI tool?
भारतजीपीटी हे AI टूल तयार करण्यासाठी आयआयटी बॉम्बे देखील रिलायन्स जिओ सोबत काम करत असल्याची माहिती रिलायन्स जिओचे चेअरपर्सन आकाश अंबानी यांनी दिली आहे. २०१४ पासून BharatGPT वर काम चालू झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील प्रत्येक कंपनीला त्यांच्या व्यवसायासाठी भारतजीपीटी हे टूल वापरता यावे असा रिलायन्स जिओचा मानस आहे.
भारतजीपीटी म्हणजे काय? What is BharatGPT?
BharatGPT ला तुम्ही कोणत्याही भाषेत कोणताही प्रश्न विचारू शकता. सोबतच कोडींगचं काम, एखाद्या गोष्टीचे लेखन किंवा गणिताच्या समस्या अश्या आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही भारतजीपीटी च्या मदतीने करू शकणार आहात. भारतजीपीटी वर सध्या रिलायन्स जिओ मध्ये काम सुरु आहे. लवकरच हे AI टूल लोकांच्या वापरात येईल. रिलायन्स जिओ कंपनीचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी वार्षिक टेकफेस्टमध्ये भारतजीपीटी ची घोषणा केली आहे.