Mahila Samman Saving Certificate – जाणून घ्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना

Mahila Samman Saving Certificate Scheme

Mahila Samman Saving Certificate Scheme: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिलांसाठी एक नवीन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचे नाव “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना” असे आहे. हि योजना केंद्र सरकार मार्फत राबवण्यात येणार आहे.

या योजने अंतर्गत तुम्ही छोटी रक्कम एकाच वेळी या योजनेत गुंतवू शकता. या योजनेची घोषणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. २०२३ या आर्थिक वर्षामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना महिलांवर विशेष भर दिला होता. याच अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate) योजनेची घोषणा केली.

या योजने अंतर्गत २ वर्षांसाठी जमा केलेल्या रकमेवर ७.५% दराने व्याज दिले जाणार असून या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात. या योजनेमुळे महिला आपल्या छोट्या छोट्या बचत केलेल्या रकमेची चांगल्या प्रकारे गुंतवणूक करून भविष्यात स्वावलंबी होऊ शकतील.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२०२४ सादर करताना महिलांना एक मोठी भेट देण्यासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate) सुरू करण्याची घोषणा केली. महिला अनेक प्रकारे बचत करत असतात. पण महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजने अंतर्गत गुंतवणूक केल्यास महिलांना अधिक फायदा होऊ शकतो.

या योजनेचा लाभ कसा घ्यावा? – How can I get Mahila Samman certificate?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना या योजनेसाठी अर्ज कोठे करावा – How to apply mahila samman savings certificate

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate) हि योजना देशभरातील अनेक बँका तसेच पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. छोट्या खेडे गावामध्ये बँक नसली तरी पोस्ट ऑफिस असतेच त्यामुळेच या योजनेचा लाभ पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन देखील घेता येणार आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेसाठी अर्ज करावा लागतो, त्या अर्जाची पात्रता – Who is eligible for Mahila samman savings Patra?

  • देशातील सर्व महिला “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate)” योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
  • योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी वय वर्षे १० किंवा त्याहून अधिक वयाच्या मुली/महिला आपले खाते उघडून आपली गुंतवणूक करू शकतात.
  • महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate) यामध्ये महिलांसाठी २ लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीचा पर्याय असेल.
  • महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योज़ने अंतर्गत गुंतवल्या जाणाऱ्या रक्मेवर ७.५ % निश्चित व्याज मिळेल.
  • सर्व धर्म, वर्ग, जातीच्या महिला व मुलींना महिला सन्मान बचत पत्र योजनेचा लाभ घेऊ शकतात.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेचा अर्ज भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत – What documents are required for Mahila samman savings account?

१) अर्जदाराचे आधार कार्ड
२) कोणत्याही प्रकारचे ओळख पुरावा(आधारकार्ड / पॅनकार्ड / ड्रायविंग लायसन्स )
३) पासपोर्ट आकाराचा फोटो
४) ई – मेल आयडी
५) स्वतःचा फोन नंबर

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचे व्याज कशा प्रमाणे मिळेल – What is the amount of Mahila samman savings certificate?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate) या योजनेंतर्गत, अर्जदार २ वर्षांच्या कालावधीसाठी पैसे आपल्या या खात्यावर जमा करू शकतो, २ वर्षांच्या कालावधीत, पहिल्या वर्षाला १५०००/- रुपयांचा लाभ लाभ मिळेल, म्हणजेच २ वर्षांच्या गुंतवणुकीवर, तुम्हाला २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत रु.३१०००/- चा लाभ मिळेल. म्हणजेच जर तुम्ही या योजनेंतर्गत २ वर्षांसाठी रु.२,००,०००/- गुंतवले; तर तुम्हाला वार्षिक ७.५% व्याज मिळेल. अशा प्रकारे, पहिल्या वर्षी, तुम्हाला मूळ रकमेवर (रु २,००,०००/-वर ) रु. १५,०००/- मिळतील आणि दुसर्‍या वर्षी, (रु. २,१५,०००/- एकूण रक्कम ) तुम्हाला रु. १६,१२५/- मिळतील. अशा प्रकारे, दोन वर्षांच्या शेवटी, तुम्हाला एकूण रु . २, ३१,१२५/- (२,००,००० सुरवातीची गुंतवणूक रक्कम + दोन वर्षांसाठी मिळलेले व्याज ३१,१२५/-) मिळतील.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate) योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

  • केंद्र सरकारच्या आत्तापर्यंतच्या अल्पबचत योजनांप्रमाणेच महिलांच्या कल्याणासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • ही केंद्र सरकारची एक वेगळीच एक वेळ बचत योजना आहे.
  • योजनेत अर्जदार (महिला) एकाच वेळी २ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
  • योजनेअंतर्गत अर्जदार फक्त २ वर्षांसाठीच गुंतवणूक करू शकतील.
  • योजनेंतर्गत सरकारने जाहीर केलेला व्याज दर वार्षिक ७.५ टक्के एवढे आहे.
  • योजनेद्वारे अर्जदार महिलेने जमा केलेल्या रकमेवर सरकार करातून सूट देईल.
  • योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना योजनेत गुंतवणूक करून करात सूट मिळू शकते.
  • योजनेअंतर्गत वय वर्षे १० किंवा त्याहून अधिक वयाच्या मुली/महिला आपले खाते उघडू शकतील.
  • देशातील अनेक महिला महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेअंतर्गत बचत करून स्वावलंबी होऊ शकतील.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही २ वर्षांची बचत योजना असेल, ज्याचा लाभ फक्त २०२५ पर्यंत घेता येईल. त्यामुळे महिलांनी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेचा जास्ती जास्त प्रमाणात लाभ करून घ्यावा.

FAQ:

Q1. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र म्हणजे काय? What is Mahila Samman savings certificate?

या योजने अंतर्गत तुम्ही २ लाख रुपयांपर्यंत रक्कम एकाच वेळी या योजनेत गुंतवू शकता. या योजने अंतर्गत २ वर्षांसाठी जमा केलेल्या रकमेवर ७.५% दराने व्याज दिले जाणार असून या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात. या योजनेमुळे महिला आपल्या छोट्या छोट्या बचत केलेल्या रकमेची चांगल्या प्रकारे गुंतवणूक करून भविष्यात स्वावलंबी होऊ शकतील.

Q2. मला महिला सन्मान प्रमाणपत्र कसे मिळेल? How can I get Mahila Samman certificate?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate) हि योजना देशभरातील अनेक बँका तसेच पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. छोट्या खेडे गावामध्ये बँक नसली तरी पोस्ट ऑफिस असतेच त्यामुळेच या योजनेचा लाभ पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन देखील घेता येणार आहे.

Q3. महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात किमान ठेव किती आहे? What is the minimum deposit in Mahila samman savings certificate?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्रासाठी किमान १०००/- रु. असून कमाल ठेव रक्कम रु. २ लाख पर्यंत ची गुंतवणूक करू शकता.

Q4. महिला सन्मान बचत करमुक्त आहे का? Is Mahila Samman saving tax free?

ही योजना वार्षिक ७.५ टक्के व्याजदर देते. योजनेतून मिळणारे व्याज देखील करपात्र आहे. योजनेतून मिळणाऱ्या व्याजावर कोणतीही कर सूट उपलब्ध नाही. दोन वर्षांच्या संपूर्ण गुंतवणुकीच्या कालावधीत व्याजदर स्थिर राहील.

हे वाचा: Vishwakarma Yojana – जाणून घ्या काय आहे विश्वकर्मा योजना

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment