Moto g04: मोटोरोला ने सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. मोटोरोला नेहमीच नवीन टेक्नॉलॉजी चा वापर करून ग्राहकांना आकर्षित करत असते. या नवीन फोनमध्ये असेच काहीसे आहे. ज्या ग्राहकांना स्वस्त दरामध्ये स्मार्टफोन घेण्याची इच्छा असेल अशा ग्राहकांनी हे आर्टिकल नक्की वाचा. या आर्टिकल मध्ये मोटोरोलाच्या नवीन स्मार्टफोन बद्दल पूर्ण माहिती आम्ही दिली आहे.
मोटरोला ने मोटो जी ०४ (Moto g04) नावाने स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित My UX वर चालतो आणि दोन वर्षांच्या सुरक्षा पॅच या सोबत मिळणार आहे.
Table of Contents
हा स्मार्टफोन जरी कमी किमतीचा असला तरी यामध्ये देण्यात आलेले फीचर्स या किमतीपेक्षा जास्त किंमत असलेल्या स्मार्टफोनमध्ये देखील देण्यात आलेले नाहीत. या स्मार्टफोनमध्ये Ai तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊयात या नवीन स्मार्टफोनमध्ये काय काय आपल्याला मिळणार आहे.
मोटो जी ०४ डिस्प्ले – Moto g04 Display
Moto g04 मध्ये ६.६ इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ९० Hz रिफ्रेश रेट सह IPS LCD डिस्प्ले मध्ये ७२० x १६०० चे रिझोल्यूशन मोटोरोला च्या या नवीन स्मार्टफोन मध्ये तुम्हांला मिळणार आहे. मोटो जी ०४ च्या या डिस्प्लेमध्ये ५३७ nits चा ब्राइटनेस मिळणार आहे.
या स्मार्टफोनचा डिस्प्ले डॉल्बी ॲटमॉसला देखील सपोर्ट करतो आणि Moto g04 मध्ये डॉल्बी ॲटमॉस-ट्यून्ड स्पीकर देखील देण्यात आले आहेत. स्मार्टफोन त्वरित अनलॉक करण्यासाठी साइड-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. मोटो जी ०४ मध्ये पांडा ग्लास संरक्षण मिळणार आहे.
मोटो जी ०४ कॅमेरा – Moto g04 Camera
मोटो जी ०४ मध्ये १६ मेगापिक्सेल चा कॅमेरा LED फ्लॅश सोबत देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा ५ मेगापिक्सेल देण्यात आला आहे. तुम्हांला वाटेल कि एवढ्या कमी मेगापिक्सेलने फोटो चांगले येतील का? तर उत्तर आहे.. हो, कारण या स्मार्टफोन मध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे तुम्ही काढलेले फोटो उत्कृष्ट येणार आहेत.
वेगवेगळ्या एक्सपोजरमध्ये टिपलेले रात्रीचे फोटो देखील अचूक रंग संगती देणार आहेत. त्यामुळे प्रत्येक क्षण तुम्ही चांगल्या पद्धतीने कॅप्चर करू शकाल. मोटो जी ०४ मध्ये १६ मेगापिक्सेल च्या कॅमेऱ्याला तुम्ही कमी समजू नये. कमी किंमतीत तुम्हांला एक चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन देण्याचा प्रयत्न मोटोरोलाकडून करण्यात आला आहे.
मोटो जी ०४ प्रोसेसर- Moto g04 Processor
मोटो जी ०४ मध्ये Unisoc T606 12nm – Octa Core प्रोसेसर वापरण्यात आला आहे. मोटो जी ०४ चा प्रोसेसर हाय-स्पीड कामगिरी करण्यासाठी सक्षम आहे. या स्मार्टफोन मध्ये स्मूद मल्टीटास्किंग करता येणार आहे. ॲप्स जलद उघडण्यासाठी आणि अखंडपणे मल्टीटास्क करण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये ८GB पर्यंत अतिरिक्त रॅम जोडता येणार आहे.
मोटो जी ०४ बॅटरी आणि चार्जर – Moto g04 Battery & Charger
मोटो जी ०४ या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची अल्ट्रा-लार्ज बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हांला संपूर्ण दिवस स्मार्टफोन चार्ज करावा लागणार नाही. या स्मार्टफोनची अल्ट्रा-लार्ज बॅटरी १५W ची फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. १५W च्या चार्जर सोबत USB Type-C पोर्ट या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे.
कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ 5.0, GPS, डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह सिंगल स्पीकर, 3.5 मिमी ऑडिओ जॅक देण्यात आला आहे.
मोटो जी ०४ ची किंमत – Moto g04 Price in India
मोटो जी ०४ भारतीय बाजारात आला असून ४GB रॅम + ६४GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ६,९९९/- तर ८GB रॅम + १२८GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ७,४९९/- ठेवण्यात आली आहे. मोटो जी ०४ हा स्मार्टफोन कॉन्कॉर्ड ब्लॅक, सी ग्रीन, सॅटिन ब्लू आणि सनराइज ऑरेंज या ४ कलर मध्ये भारतीय बाजारात उपलब्द असणार आहे.
मोटो जी ०४ भारतात लॉन्च होण्याची तारीख – Moto g04 Launch Date in India
मोटोरोलाच्या अधिकृत वेबसाईट वरून किंवा फ्लिपकार्ट वर जाऊन तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहात. २२ फेब्रुवारी २०२४ पासून मोटो जी ०४ हा स्मार्टफोन तुम्हांला विकत घेता येईल.
FAQ:
मोटो जी ०४ तपशील? Moto g4 specifications?
Moto g04 मध्ये ६.६ इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ९० Hz रिफ्रेश रेट सह IPS LCD डिस्प्ले मध्ये ७२० x १६०० चे रिझोल्यूशन मोटोरोला च्या या नवीन स्मार्टफोन मध्ये तुम्हांला मिळणार आहे. मोटो जी ०४ मध्ये १६ मेगापिक्सेल चा कॅमेरा LED फ्लॅश सोबत देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा ५ मेगापिक्सेल देण्यात आला आहे. मोटो जी ०४ या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची अल्ट्रा-लार्ज बॅटरी देण्यात आली आहे. १५W च्या चार्जर सोबत USB Type-C पोर्ट या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे.
मोटो जी ०४ प्रोसेसर? Moto g04 Processor?
मोटो जी ०४ मध्ये Unisoc T606 12nm – Octa Core प्रोसेसर वापरण्यात आला आहे. मोटो जी ०४ चा प्रोसेसर हाय-स्पीड कामगिरी करण्यासाठी सक्षम आहे. या स्मार्टफोन मध्ये स्मूद मल्टीटास्किंग करता येणार आहे. ॲप्स जलद उघडण्यासाठी आणि अखंडपणे मल्टीटास्क करण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये ८GB पर्यंत अतिरिक्त रॅम जोडता येणार आहे.
मोटो जी ०४ बॅटरी? Moto g04 Battery?
मोटो जी ०४ या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची अल्ट्रा-लार्ज बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हांला संपूर्ण दिवस स्मार्टफोन चार्ज करावा लागणार नाही. या स्मार्टफोनची अल्ट्रा-लार्ज बॅटरी १५W ची फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. १५W च्या चार्जर सोबत USB Type-C पोर्ट या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे.
मोटो जी ०४ ची किंमत? Moto g04 Price in India?
मोटो जी ०४ भारतीय बाजारात आला असून ४GB रॅम + ६४GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ६,९९९/- तर ८GB रॅम + १२८GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ७,४९९/- ठेवण्यात आली आहे. मोटो जी ०४ हा स्मार्टफोन कॉन्कॉर्ड ब्लॅक, सी ग्रीन, सॅटिन ब्लू आणि सनराइज ऑरेंज या ४ कलर मध्ये भारतीय बाजारात उपलब्द असणार आहे.
मोटो जी ०४ भारतात लॉन्च होण्याची तारीख? Moto g04 Launch Date in India?
मोटोरोलाच्या अधिकृत वेबसाईट वरून किंवा फ्लिपकार्ट वर जाऊन तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहात. २२ फेब्रुवारी २०२४ पासून मोटो जी ०४ हा स्मार्टफोन तुम्हांला विकत घेता येईल.