Noise Colorfit Thrill Smartwatch: नॉईजने नवीन कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच भारतात लॉन्च केले आहे. नॉईजच्या या नवीन स्मार्टवॉचमध्ये मोठा डिस्प्ले असणार आहे. कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच सर्वांना परवडणाऱ्या दरात बाजारात आणले आहे.
Table of Contents
नॉईज कंपनीचे संस्थापक अमित खत्री आणि गौरव खत्री भारतीय असून २०१४ साली त्यांनी कंपनीची स्थापना केली आहे. भारतात वायरलेस इयरफोन विकणाऱ्या टॉप 5 ब्रँडमध्ये नॉईजचे नाव आहे. सोबतच नॉईज च्या स्मार्टवॉचला भारतीय ग्राहकांची पसंती मिळत आहे. भारतीय ग्राहकांना परवडणारी उपकरणे नॉईज ने बाजारात उपलब्ध केली आहेत.
कलर फिट थ्रिल स्मार्टवॉच माहिती – Noise Colorfit Thrill Smartwatch Information:
नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच (Noise Colorfit Thrill Smartwatch) मध्ये २.० इंचाचा टीएफटी एलसीडी डिस्प्ले असणार आहे. ५५० निट्सच्या ब्राईटनेस सोबत २४० x २९६ पिक्सेल स्क्रीन रिजोल्यूशन कलरफिट थ्रिल स्मार्टवॉचच्या डिस्प्लेमध्ये देण्यात आले आहे.
नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच (Noise Colorfit Thrill Smartwatch) मध्ये ब्लूटूथ वर्जन v५.२ असणार आहे. कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच मध्ये ब्लूटूथ कॉलिंग देण्यात आले आहे. इनबिल्ट माइक्रोफोन आणि स्पीकर मुळे कॉलिंग करणे सोपे जाणार आहे. कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच मध्ये नोटिफिकेशन डिस्प्ले, वेदर अपडेट्स, रिमाइंडर, अलार्म, कैमरा कंट्रोल, म्यूजिक कंट्रोल, कॅल्कुलेटर या सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
हार्ट मॉनेटरिंग फिचर्स मध्ये हार्ट रेट मॉनिटर, स्टेप ट्रॅकर, स्लिप मॉनिटर, फिमेल सायकल ट्रॅकर, कॅलरी बर्न, SpO2 मॉनिटर, ऍक्टिव्हिटी हिस्ट्री, स्ट्रेस मेजरमेंट आणि स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत. नॉईजफिट च्या ॲपचा वापर करून या फिचर्सचा उपयोग करता येईल.
नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच (Noise Colorfit Thrill Smartwatch) ला IP68 ची रेटिंग देण्यात आली आहे ज्यामुळे हे स्मार्टवॉच पाण्यापासून आणि धुळीपासून सुरक्षित आहे. १.५ मीटर खोल पाण्याखाली ३० मिनिटांपर्यंत हे स्मार्टवॉच वापरू शकता. गरम पाणी किंवा समुद्राच्या पाण्यात हे नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच वापरणे टाळा. कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच अँड्रॉइड आणि आय फोन मध्ये सहज कनेक्ट होईल.
बॅटरी आणि चार्जिंग – Battery and charging
नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉचची (Noise Colorfit Thrill Smartwatch) बॅटरी पॉवरफुल आहे. २ तासात हे नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच फुल चार्ज होते. त्यामुळे एकदा चार्ज करून हे स्मार्टवॉच तुम्ही १५ दिवस वापरू शकता. नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉचचा पट्टा त्वचेला अनुकूल आणि घाम प्रतिरोधक असल्यामुळे जास्त वेळासाठी तुम्ही हे स्मार्टवॉच हातात घालून राहू शकाल.
नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच (Noise Colorfit Thrill Smartwatch) मध्ये १० कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही सेव करू शकणार आहात. सोबतच नुकतेच येऊन गेलेले कॉल तुम्ही चेक करू शकाल. कॉल लावण्यासाठी डायल पॅड देखील देण्यात आला आहे. नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच अँड्रॉइड च्या ९.० च्या पुढील आणि आय फोन iOS ११.० च्या पुढील मोबाईल ना सपोर्ट करणार आहे त्यामुळे जर तुम्ही यापैकी कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीम च्या आधीच वर्जन वापरत असाल तर हे स्मार्टवॉच तुम्हांला वापरता येणार नाही याची काळजी घ्या.
नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच किंमत – Noise Colorfit Thrill Smartwatch Price
नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच (Noise Colorfit Thrill Smartwatch) ५ रंगामध्ये उपलब्ध असणार आहे ज्यामध्ये केमो ग्रे, केमो ग्रीन, विंटेज ब्राउन, जेट ब्लैक आणि थंडर ग्रे या रंगांचा समावेश आहे. नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉचची सुरुवातीची किंमत हि सर्वांना परवडणारी म्हणजेच फक्त १८९९/- रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या अधिकृत वेब साईट वरून तुम्ही हे नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच विकत घेऊ शकता. लवकरच फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन वर हे स्मार्टवॉच विक्रीसाठी उपलब्ध होईल.
FAQ:
कलरफिट थ्रिलमध्ये पूर्ण टचस्क्रीन डिस्प्ले आहे का? Does Noise Colorfit Thrill Smartwatch have a full touchscreen display?
नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच मध्ये २.० इंचाचा टीएफटी एलसीडी डिस्प्ले असणार आहे. ५५० निट्सच्या ब्राईटनेस सोबत २४० x २९६ पिक्सेल स्क्रीन रिजोल्यूशन कलरफिट थ्रिल स्मार्टवॉचच्या डिस्प्लेमध्ये देण्यात आले आहे.
कलरफिट थ्रिल न तुटणारे आहे का? Is Noise Colorfit Thrill Smartwatch shockproof?
नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच तुम्हांला जपून वापरावे लागेल कारण उंचावरून पडल्यास हे स्मार्टवॉच खराब होऊ शकते.
कलरफिट थ्रिल वरून कॉल करता येणार का? Does Noise Colorfit Thrill Smartwatch come with a calling feature?
कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच मध्ये ब्लूटूथ कॉलिंग देण्यात आले आहे. इनबिल्ट माइक्रोफोन आणि स्पीकर मुळे कॉलिंग करणे सोपे जाणार आहे. नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच मध्ये १० कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही सेव करू शकणार आहात. सोबतच नुकतेच येऊन गेलेले कॉल तुम्ही चेक करू शकाल. कॉल लावण्यासाठी डायल पॅड देखील देण्यात आला आहे.
कलरफिट थ्रिल वॉटरप्रूफ आहे का? Is Noise Colorfit Thrill Smartwatch waterproof?
नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच ला IP68 ची रेटिंग देण्यात आली आहे ज्यामुळे हे स्मार्टवॉच पाण्यापासून आणि धुळीपासून सुरक्षित आहे. १.५ मीटर खोल पाण्याखाली ३० मिनिटांपर्यंत हे स्मार्टवॉच वापरू शकता. गरम पाणी किंवा समुद्राच्या पाण्यात हे नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच वापरणे टाळा.
नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच किंमत? Noise Colorfit Thrill Smartwatch Price?
नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच ५ रंगामध्ये उपलब्ध असणार आहे ज्यामध्ये केमो ग्रे, केमो ग्रीन, विंटेज ब्राउन, जेट ब्लैक आणि थंडर ग्रे या रंगांचा समावेश आहे. नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉचची सुरुवातीची किंमत हि सर्वांना परवडणारी म्हणजेच फक्त १८९९/- रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या अधिकृत वेब साईट वरून तुम्ही हे नॉईज कलरफिट थ्रिल स्मार्टवॉच विकत घेऊ शकता.