OnePlus 12: वन-प्लस चा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च

OnePlus 12 Price in India

OnePlus 12: OnePlus ने त्यांचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. OnePlus एका पेक्षा एक असे नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात घेऊन येत आहे.

नवीन आधुनिक फिचर्स ने हे नवीन स्मार्टफोन भरलेले आहेत. त्यातच आता OnePlus ने त्यांचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन वन-प्लस १२ हा भारतीय बाजारात आणला आहे. फ्लॅगशिप म्हटलं कि त्यामध्ये काय नवीन आहे याची ग्राहकांना उत्सुकता असते. अश्या ग्राहकांसाठी हे आर्टिकल आम्ही घेऊन आलो आहोत. जाणून घ्या काय काय आहे या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये. 

वन-प्लस १२ डिस्प्ले – OnePlus 12 Display

OnePlus 12 मध्ये ६.८२ इंचाचा गोरिला ग्लास (Gorilla Glass Victus 2) डिस्प्ले देण्यात आला आहे. रेकॉर्ड-ब्रेकिंग 2K १२० Hz रिफ्रेश रेट सह LTPO AMOLED डिस्प्ले मध्ये १४४० x ३१६८ चे रिझोल्यूशन वन-प्लस च्या या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये तुम्हांला मिळणार आहे. वन-प्लस १२ च्या या डिस्प्ले मध्ये ४५०० nits चा ब्राइटनेस मिळणार आहे, त्यामुळे उन्हामध्ये देखील स्मार्टफोन वापरणे सोपे जाणार आहे. स्मार्टफोन त्वरित अनलॉक करण्यासाठी अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. OnePlus 12 ला IP65 रेटिंग असल्यामुळे हा स्मार्टफोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित आहे.

वन-प्लस १२ कॅमेरा – OnePlus 12 Camera

वन-प्लस १२ चा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा वाईड अँगल असून दुसरा कॅमेरा ६४ मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो आणि तिसरा कॅमेरा ४८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा असा ट्रिपल कॅमेरा सेटअप या फ्लॅगशिप फोन मध्ये देण्यात आला आहे. सोबतच ३२ मेगापिक्सेल चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोन मध्ये 8K व्हिडिओ रेकॉर्ड 24fps मध्ये तर 4K व्हिडिओ रेकॉर्ड 30/60fps मध्ये करता येणार आहे.

सोबतच 1080p व्हिडिओ रेकॉर्ड 30/60/240/480fps मध्ये करता येईल. त्यामुळे तुम्हांला व्हिडिओ रेकॉर्ड करताना बरेच पर्याय या फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये मिळणार आहेत. ३२ मेगापिक्सेलच्या सेल्फी कॅमेऱ्याने सुद्धा 4K व्हिडिओ रेकॉर्ड 30fps मध्ये तर 1080p व्हिडिओ रेकॉर्ड 30fps मध्ये करता येणार आहे.

वन-प्लस १२ प्रोसेसर- OnePlus 12 Processor

OnePlus 12 मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 – Octa-core प्रोसेसर वापरण्यात आला आहे. वन-प्लस १२ चा प्रोसेसर हाय-स्पीड कामगिरी करण्यासाठी सक्षम आहे. या स्मार्टफोन चा AnTuTu स्कोअर १,८२१,८०१ आहे. गेमिंग खेळणाऱ्या ग्राहकांना या स्मार्टफोनच्या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. अल्ट्रा-फ्लॅगशिप CPU आणि 16GB पर्यंत LPDDR5X रॅम मुळे हा स्मार्टफोन एक वेगळाच आनंद वापरताना देणार आहे.  

OnePlus 12 Price in India

वन-प्लस १२ बॅटरी आणि चार्जर – OnePlus 12 Battery & Charger

OnePlus 12 या फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये ५४०० mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हांला दोन दिवस स्मार्टफोन चार्ज करावा लागणार नाही. स्मार्टफोन सोबत १००W चा चार्जर मिळणार आहे. या १००W च्या चार्जरला ० ते १०० टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी २६ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. तर ५०W च्या  वायरलेस चार्जरला ० ते ५० टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी ५५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. वन-प्लस १२ मध्ये १००W च्या चार्जर सोबत USB Type-C केबल देखील मिळणार आहे.

वन-प्लस १२ ची भारतात किंमत – OnePlus 12 Price in India

OnePlus 12 भारतीय बाजारात आला असून असून १२GB रॅम + २५६GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ६४,९९९/- तर १६GB रॅम + ५१२GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ६९,९९९/- ठेवण्यात आली आहे. वन-प्लस च्या अधिकृत वेबसाईट वरून तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहात. जर तुमच्याकडे ICICI किंवा OneCard चे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हांला हा फोन घेताना २०००/- चे डिस्काउंट मिळणार आहे. तुम्ही हा स्मार्टफोन नो कोस्ट EMI वर देखील घेऊ शकणार आहात. 

वन-प्लस १२ भारतात लॉन्च होण्याची तारीख – OnePlus 12 Launch Date in India

OnePlus 12 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन २३ जानेवारी २०२४ ला भारतात लॉन्च करण्यात आला आहे. ३० जानेवारी २०२४ पासून वन-प्लस च्या अधिकृत वेबसाईटवर हा स्मार्टफोन तुम्हांला विकत घेता येणार आहे.

FAQ:

वन-प्लस १२ कॅमेरा? OnePlus 12 Camera?

वन-प्लस १२ चा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा वाईड अँगल असून दुसरा कॅमेरा ६४ मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो आणि तिसरा कॅमेरा ४८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा असा ट्रिपल कॅमेरा सेटअप या फ्लॅगशिप फोन मध्ये देण्यात आला आहे. सोबतच ३२ मेगापिक्सेल चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

वन-प्लस १२ बॅटरी? OnePlus 12 Battery?

OnePlus 12 या फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये ५४०० mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हांला दोन दिवस स्मार्टफोन चार्ज करावा लागणार नाही. स्मार्टफोन सोबत १००W चा चार्जर मिळणार आहे. या १००W च्या चार्जरला ० ते १०० टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी २६ मिनिटांचा कालावधी लागणार आहे.

वन-प्लस १२ ची भारतात किंमत? OnePlus 12 Price in India?

OnePlus 12 भारतीय बाजारात आला असून असून १२GB रॅम + २५६GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ६४,९९९/- तर १६GB रॅम + ५१२GB मेमरी असलेल्या मॉडेल ची किंमत ६९,९९९/- ठेवण्यात आली आहे. वन-प्लस च्या अधिकृत वेबसाईट वरून तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहात. जर तुमच्याकडे ICICI किंवा OneCard चे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हांला हा फोन घेताना २०००/- चे डिस्काउंट मिळणार आहे. तुम्ही हा स्मार्टफोन नो कोस्ट EMI वर देखील घेऊ शकणार आहात.

हे वाचा: Redmi Note 13 Pro Plus 5G – २०० मेगापिक्सेलचा स्मार्टफोन, किंमत???

ही पोस्ट शेअर करा:

Leave a Comment