Realme 12 Pro series: Realme ने Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ असे दोन नवीन मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. एक उत्तम प्रोसेसर आणि चांगल्या कॅमेरा या स्मार्टफोन चे वैशिष्ठ आहे.
नवीन आधुनिक फिचर्स ने भरलेले हे दोन्ही मॉडेल असणार आहेत. Realme चा नवीन स्मार्टफोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आमचे हे आर्टिकल मदत करेल अशी आमची आशा आहे. चला तर जाणून घेऊया Realme ने त्यांच्या नवीन स्मार्टफोन मध्ये काय काय दिले आहे.
Table of Contents
रियलमी १२ प्रो आणि प्रो प्लस डिस्प्ले – Realme 12 Pro and Realme 12 Pro+ Display
रियलमी १२ प्रो सीरिज मध्ये ९५० निट्स पीक ब्राइटनेस सोबत ६.७ इंचाचा FHD+ curved OLED ProXDR डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले मध्ये २४१२ x १०८० चे रिझोल्यूशन रियलमी १२ प्रो सीरिज च्या या नवीन स्मार्टफोन मध्ये तुम्हांला मिळणार आहे. सेल्फी शूटरसाठी पंच-होल कटआउट रियलमी १२ प्रो सीरिज च्या डिस्प्लेला देण्यात आले आहे.
रियलमी १२ प्रो आणि प्रो प्लस कॅमेरा – Realme 12 Pro and Pro+ Camera
रियलमी १२ प्रो (Realme 12 Pro) मध्ये ५० मेगापिक्सेलचा सोनी IMX882 प्राथमिक कॅमेरा असून दुसरा कॅमेरा ३२ मेगापिक्सेलचा सोनी IMX709 टेलिफोटो आणि तिसरा कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा असा ट्रिपल कॅमेरा सेटअप या स्मार्टफोन मध्ये देण्यात आला आहे. सोबतच १६ मेगापिक्सेल चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
रियलमी १२ प्रो प्लस मध्ये ५० मेगापिक्सेलचा सोनी IMX890 प्राथमिक कॅमेरा असून दुसरा कॅमेरा ६४ मेगापिक्सेलचा OV64B पेरिस्कोप टेलिफोटो आणि तिसरा कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा असा ट्रिपल कॅमेरा सेटअप या स्मार्टफोन मध्ये देण्यात आला आहे. सोबतच ३२ मेगापिक्सेल चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
रियलमी १२ प्रो आणि प्रो प्लस प्रोसेसर – Realme 12 Pro and Pro+ Processor
रियलमी १२ प्रो मध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर वापरण्यात आला असून रियलमी १२ प्रो प्लस मध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. दोन्ही फोन मध्ये Android 14 आधारित Realme UI 5.0 कस्टम स्किन देण्यात आली आहे. रियलमी १२ प्रो ८GB +१२८GB आणि ८GB + २५६GB अश्या दोन पर्यायांमध्ये उपलब्द असून रियलमी १२ प्रो प्लस मध्ये ८GB+१२८GB, ८GB+२५६GB आणि १२GB+२५६GB अश्या तीन पर्यायांमध्ये उपलब्द आहे.
रियलमी १२ प्रो आणि प्रो प्लस बॅटरी आणि चार्जर – Realme 12 Pro and Pro+ Battery & Charger
रियलमी १२ प्रो आणि रियलमी १२ प्रो प्लस मध्ये ५००० mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हांला दोन दिवस स्मार्टफोन चार्ज करावा लागणार नाही. स्मार्टफोन सोबत ६७W चा चार्जर मिळणार आहे. या ६७W च्या चार्जरला ० ते १०० टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी ४८ मिनिटांचा कालावधी लागणार आहे.
रियलमी १२ प्रो आणि प्रो प्लस मध्ये कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, GPS आणि चार्जिंगसाठी USB टाइप-सी पोर्ट समाविष्ट आहे.
रियलमी १२ प्रो आणि प्रो प्लस ची भारतात किंमत – Realme 12 Pro and Realme 12 Pro+ Price in India
रियलमी १२ प्रो ८GB +१२८GB ची किंमत २५,९९९/- तर ८GB + २५६GB ची किंमत २६,९९९/- ठेवण्यात आली आहे. रियलमी १२ प्रो प्लस ८GB+१२८GB ची किंमत २९,९९९/-, ८GB+२५६GB ची किंमत ३१,९९९/- आणि १२GB+२५६GB ची किंमत ३३,९९९/- ठेवण्यात आली आहे. जर तुमच्याकडे ICICI चे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हांला हा फोन घेताना २०००/- चे डिस्काउंट मिळणार आहे. तुम्ही हा स्मार्टफोन नो कोस्ट EMI वर देखील घेऊ शकणार आहात. रियलमी १२ प्रो मध्ये दोन कलर पर्याय तुम्हांला मिळणार आहेत ज्यामध्ये सबमरीन ब्लू आणि नेव्हिगेटर बेज या कलरचा समावेश आहे तर रियलमी १२ प्रो प्लस मध्ये सबमरीन ब्लू, नेव्हिगेटर बेज आणि फक्त भारतासाठी एक्सप्लोरर रेड या तीन कलरचा समावेश आहे.
रियलमी १२ प्रो आणि प्रो प्लस भारतात लॉन्च होण्याची तारीख – Realme 12 Pro and Pro+ Launch Date in India
रियलमी १२ प्रो (Realme 12 Pro series) सीरिज २९ जानेवारी २०२४ पासून रियलमी च्या अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्ट वर प्री बुकिंग सुरु झाली आहे. ६ फेब्रुवारी २०२४ पासून स्मार्टफोनची विक्री सुरु होईल.
FAQ:
Realme 12 Pro तपशील? Realme 12 Pro Specifications?
रियलमी १२ प्रो सीरिज मध्ये ९५० निट्स पीक ब्राइटनेस सोबत ६.७ इंचाचा FHD+ curved OLED ProXDR डिस्प्ले देण्यात आला आहे. Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ मध्ये ५००० mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. रियलमी १२ प्रो मध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर वापरण्यात आला असून रियलमी १२ प्रो प्लस मध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. रियलमी १२ प्रो आणि प्रो प्लस मध्ये कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, GPS आणि चार्जिंगसाठी USB टाइप-सी पोर्ट समाविष्ट आहे.
रियलमी १२ प्रो आणि प्रो प्लस प्रोसेसर? Realme 12 Pro Processor?
रियलमी १२ प्रो मध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर वापरण्यात आला असून रियलमी १२ प्रो प्लस मध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. दोन्ही फोन मध्ये Android 14 आधारित Realme UI 5.0 कस्टम स्किन देण्यात आली आहे.
रियलमी १२ प्रो ची भारतात किंमत ? Realme 12 Pro Price in India?
रियलमी १२ प्रो ८GB +१२८GB ची किंमत २५,९९९/- तर ८GB + २५६GB ची किंमत २६,९९९/- ठेवण्यात आली आहे. जर तुमच्याकडे ICICI चे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हांला हा फोन घेताना २०००/- चे डिस्काउंट मिळणार आहे. तुम्ही हा स्मार्टफोन नो कोस्ट EMI वर देखील घेऊ शकणार आहात.
रियलमी १२ प्रो प्लस ची भारतात किंमत ? Realme 12 Pro Plus Price in India?
रियलमी १२ प्रो प्लस ८GB+१२८GB ची किंमत २९,९९९/-, ८GB+२५६GB ची किंमत ३१,९९९/- आणि १२GB+२५६GB ची किंमत ३३,९९९/- ठेवण्यात आली आहे. जर तुमच्याकडे ICICI चे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हांला हा फोन घेताना २०००/- चे डिस्काउंट मिळणार आहे. तुम्ही हा स्मार्टफोन नो कोस्ट EMI वर देखील घेऊ शकणार आहात.