नीरज चोप्राचा ऐतिहासिक विजय जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले

हंगेरीतील बुडापेस्ट या शहरात २७ ऑगस्ट रोजी झालेल्या स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची त्याने ही कामगिरी केली.

नीरज चोप्रा याने ८८.१७ मीटर अंतरापर्यंत थ्रो केला.

या अभूतपूर्व कामगिरीच्या जोरावर जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला त्याने पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

या आधी नीरजने ऑलिम्पिक, डायमंड लीग, आशियाई  ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप, आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळ अश्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

पुरुष भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राचे (Neeraj Chopra) निर्विवाद वर्चस्व आहे, त्याच्या नावे ८९.९४ मीटर थ्रो चा जागतिक विक्रम आहे.

२०२२ मध्ये ओरेगॉन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत त्याने रौप्य पदक जिंकले होते.

ते ऐतिहासिक रौप्य पदक जागतिक चॅम्पियनशिपमधील भारताचे पहिले पदक ठरले.

नीरज चोप्राने स्वतःच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे आणि जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याची त्याची इच्छा बोलून दाखवली.