रेनॉल्ट डस्टर ची ३ री पिढी म्हणजेच डस्टरचे फेस लिफ्ट लवकरच येत आहे. रेनॉल्ट डस्टर जी आंतरराष्टीय बाजारपेठेत दासीया या नावाने विकली जाते.

नव्या डस्टरमध्ये आधुनिक फिचर्स आणि नव्या डिजाईन चा समावेश असणार आहे. या फेस लिफ्टमुळे डस्टर अजूनच बोल्ड दिसणार आहे.

आंतरराष्टीय बाजारपेठेत दाखवण्यात आलेल्या रेनॉल्ट डस्टर (दासीया) मध्ये खूप बदल करण्यात आले आहेत.

नव्या रेनॉल्ट डस्टरचा डॅशबोर्ड पूर्णतः बदलण्यात आला आहे. त्यासोबतच प्रीमियम सीट देण्यात आल्या आहेत.

नव्या रेनॉल्ट डस्टरचा इन्फोटेनमेंट सिस्टीम देखील मोठा आणि अधिक फिचर्स सोबत डिजिटल इंस्ट्रुमेन्ट क्लस्टर देण्यात आला आहे.

नव्या रेनॉल्ट डस्टरमध्ये ॲपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो सोबत वायरलेस कनेक्टिव्हिटी ची सुविधा मिळणार आहे.

आंतरराष्टीय बाजारपेठेत नव्या रेनॉल्ट डस्टरमध्ये तीन इंजिन असणार आहे ज्यामध्ये १.० लिटर च्या टर्बो पेट्रोल इंजिनचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त नव्या रेनॉल्ट डस्टरमध्ये १.२ लिटरच हायब्रीड इंजिन आणि १.३ लिटर चे टर्बो पेट्रोल इंजिन असणार आहे.

नव्या रेनॉल्ट डस्टरमध्ये ADAS टेक्नोलॉजी चा वापर होणार आहे. सध्या भारतात विकल्या जाणाऱ्या बऱ्याच कार मध्ये याचा वापर केला जातो.